सातपुड्यातील नागरिकांनी आमदारांपुढे वाचला समस्यांचा पाढा

0
160

नंदूरबार :- महसूल, ग्रामविकास, बांधकाम, आरोग्य, कृषी,शिक्षण, वनविभाग, पोलिस विभाग , आरोग्य, वीज मंडळ, महिला व बालविकास यासह सर्वच विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात सातपुड्यातील जनतेने आमदारांकडे समस्यांचा पाढा वाचला. तोरणमाळच्या पायथ्यापासून ते हुंडा रोषमाळ पर्यन्तच्या अतिदुर्गम भागातील नागरिकांसह तालुक्यातील कानकोपऱ्यातील नागरिक आमदारांच्या जनता दरबाराला उपस्थित होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सामान्य नागरिकांच्या विविध सरकारी कार्यालयाशी संबंधित प्रलंबित कामे, तक्रारी वा प्रश्न असतात, बऱ्याचवेळा त्यांना दाद मिळत नसल्याने एकाच ठिकाणी जनतेचे प्रश्न सुटावेत याउद्देशाने धडगाव तहसील कार्यालयात विधानपरिषचे आ.आमश्या पाडवी यांनी जनता दरबार भरवला. यावेळी सर्व सामान्य जनतेची गाऱ्हाणे आ. पाडवीनी ऐकून घेत काही अधिकाऱ्यांना जागेवरच धारेवर धरले.

IMG 20230526 WA0045 1024x472 1

यावेळी काही अधिकारी कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे न आल्याने खडसावत कामचुकार कर्मचारी व अधिकाऱ्यांना यावेळी आ.पाडवी यांनी जाब विचारत तंबी दिली. यात महसूल विभागांतर्गत येणाऱ्या प्रलंबित सातबारा नोंदी व दुरूस्ती, शिधापत्रिका, पीएम किसान, वनपट्टे दावे, कृषी विभागाच्या योजना, रोहयो व वनविभागतल्या अडचणी, तोरणमाळ व गौऱ्या भागात पाणी टँकर चालु करण्याविषयी सूचना आमदार पाडवी यांनी तहसीलदार यांना सूचना केल्या.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पंचायत समिती, पाटबंधारे, महावितरण, आरोग्य विभाग, पोलिस विभाग, वनविभाग, बांधकाम सह बाकी विभागांसंदर्भात मोठ्या प्रमाणात लेखी तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार तातडीने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगून तक्रारींचा निपटारा लवकरात लवकर करण्याचे आदेश देण्यात आलेत. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती गणेश पराडके, जि.प. समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, शिवसेना जिल्हा संघटक रामभाऊ वाडीले, शिवसेना जिल्हा युवा अधिकारी ललित जाट, जिल्हा समन्वयक रोहित चौधरी,सामाजिक कार्यकर्ते गोलू चंदेल,जसू पवार, हर्षल बोरा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here