विद्यार्थ्यांना पीएचडी फेलोशिप योजना पूर्ववत सुरू करा – ना .छगन भुजबळ..

0
116

नाशिक /मुंबई -१२/४/२३

बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना बार्टीच्या वतीने पीएचडीसाठी देण्यात येणारी फेलोशिप बंद करण्यात आल्याने बहुजन समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण प्राप्त करण्यापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे बार्टीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पीएचडी फेलोशिप योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

CB

याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी, या संस्थेद्वारे पीएडी आणि एमफील करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. २०१३ पासून सुरु असलेली फेलोशिप सरकारने थांबविल्यामुळे विद्यार्थी तसेच बहुजन समाजात संतापाचे वातावरण आहे. राज्यसरकारने बार्टी संस्थेद्वारे संशोधनासाठी वितरीत करण्यात येणारी संशोधन फेलोशिप बंद केली आहे.

इतर योजनांच्या निधीमध्ये सुद्धा कपात करण्यात आली आहे.

या विरोधात संशोधक विद्यार्थी ५० दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत.

मात्र शासनाने याबद्दल कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे विदयार्थ्यांमध्ये असंतोष पसरला असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की,फेलोशिपसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी हे ग्रामीण आणि मूलभूत सुविधा उपलब्ध नसलेल्या भागातील असून ते प्रचंड कष्ट करुन पीएचडी शिक्षणापर्यंत पोहोचले आहे. यातील बहुतेक विद्यार्थ्यांची घरातील पहिली शिक्षण घेणारी पिढी आहे.

भूमीहीन, शेतमजूर, कष्टकरी, वीटभट्टी, घरकाम करणाऱ्यांची ही मुले आज आपली गुणवत्ता सिद्ध करता आहे.

पण जर फेलोशिपच बंद झाली तरी या मुलांच्या भवितव्याचं काय होणार हा मोठाच प्रश्न आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0

त्यामुळे बार्टीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पीएचडी फेलोशिप योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

तेजस पुराणिकसह न्यूज ब्युरो,नाशिक /मुंबई ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here