नंदुरबारात श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार

0
275

नंदुरबार :- शहरातील बालवीर चौकातील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराचा जिर्णोद्धार नुकताच पार पडला. भक्तीपूर्ण आणि उत्साहात हा सोहळा संपन्न झाला. यानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत भाविकांचा अभूतपूर्व उत्साह दिसून आला. बम बम भोलेच्या गजरात भाविकांनी भक्तीमय वातावरण निर्माण केले. सायंकाळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

शहरातील भोईवाडा परिसरात नव्याने श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर उभारण्यात आले. या मंदिरात शिवलिंग, नंदी, हनुमान आणि गणपती मूर्ती स्थापित करण्यात आली. सकाळी कलशधारी कुमारीका आणि सुवासिनी महिलांच्या उपस्थितीत वाजत-गाजत मोठा मारुती मंदिरापासून कुंभारवाडा, गवळीवाडा, नवा भोईवाडा मार्गे मूर्तींची मिरवणूक बालवीर चौकात पोहचली. पुरोहितांच्या साक्षीने जोडप्यांच्या उपस्थितीत विधीवतपणे पूजन करण्यात आले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सायंकाळी सूर्यास्तानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राम रघुवंशी आणि सौ.मेघा रघुवंशी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी पालिकेचे माजी पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील, माजी नगरसेवक किरण चौधरी, पत्रकार निलेश पवार, हिरालाल चौधरी, महादू हिरणवाळे, संजय भदाणे, ठेकेदार राहुल पाटील यांच्यासह महिला, पुरुष भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर महाप्रसाद (भंडारा) वाटपाने सोहळ्याचा समारोप झाला.प्राणप्रतिष्ठा सोहळा यशस्वीतेसाठी श्री पिंपळेश्वर महादेव, हनुमान,गणेश मंदिर समितीचे कार्यकर्ते आणि परिसरातील भाविकांनी परिश्रम घेतले.

एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here