फरार आरोपींचा शोध सुरू
नंदुरबार- शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात मंगळवारी रात्री साडेअकराच्या वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील ६ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज न्यायालयाय हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
या दंगलीत दगड, विटा यासह काचेच्या बाटल्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. त्यामुळे दोन ते तीन पोलीस अधिकारी – कर्मचारी जखमी झाले आहेत. तर घटनेत मोटारसायकलीचे नुकसान करण्यात आले आहे.पोलिसांनी अश्रूधूराचा वापर करत जमावाला पांगवल्याने पुढील अनर्थ टळला होता. या भागात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शांतता आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सुमारे २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील ६ संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांना आज न्यायालयाय हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पोलिस अधिकारी परिस्थिवर लक्ष ठेऊन आहेत.
एम.डी.टी.व्ही.न्युज ब्युरो, नंदुरबार