नवापूर तालुक्यात रस्ते कामात अपहार

0
161

निपक्ष चौकशी व्हावी : पंचायत समिती सभापती बबिता गावीत यांची मागणी

नवापूर :- नवापूर तालुक्यातील २४४ रस्त्यांच्या कामांमध्ये ३५ कोटी ५४ लाख ९० हजारांच्या निधीपैकी काही रस्त्यांची कामे न करता अपहार करण्यात आला आहे. त्याची निःपक्षपणे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पंचायत समिती सभापती बबिता गावीत यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष सन २०२२-२३ मधील नवापूर तालुक्यातील ३०५४ योजने अंतर्गत २४४ रस्त्यांची कामे मंजूर झाली होती. या कामासाठी शासनाने ३५ कोटी ५४ लाख ९० हजारांचा निधी मंजूर केला होता. तालुक्यात सदर कामे जिल्हा परिषदेचे बांधकाम अधिकारी व त्यांचे संबंधित ठेकेदार यांनी केली. रस्त्यांची काही कामे केली, काही अर्धवट केली, मात्र त्यातही कामाचा दर्जा अत्यंत नित्कृष्ठ आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

याबाबत स्थानिक नागरिक वारंवार तक्रार करत आहेत. काही कामे केवळ कागदोपत्री झाल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्यांची काम न करता परस्पर निधीचा अपहार झाल्याचे दिसून येते. मंजूर विकास कामे प्रत्यक्षात न करता कामांचे बहुतांश प्रशासकीय निधीचा परस्पर अपहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. नवापूर तालुक्यातील ३०५४ अंतर्गत योजनेचा गावनिहाय २४४ कामांची यादी सोबत जोडलेली आहे. त्या गावांची निपक्षपणे तत्काळ सखोल चौकशी करावी, अशी मागणी सभापती बबिता गावीत यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नंदुरबार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नवापूर तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.


यावेळी पंचायत समिती सभापती बबिता गावीत, उपसभापती शिवाजी गावीत, सरपंच आर.सी.गावीत, पं.स.सदस्य दशरथ गावीत, धारसिंग गावीत, चांदूलाबाई वसावे, नरेंद्र गावीत, काँग्रेस तालुकाध्यक्ष जालमसिंग गावीत, करणसिंग गावीत, संतोष गवळी उपस्थित होते.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here