कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा रास्ता रोको ..

0
226

भडगाव :२४/३/२३

आम आदमी पार्टी संचलित आम आदमी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून रास्ता रोको करण्यात आलं ..
कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा पारोळा अमळनेर हायवेवर रत्ना पिंपरी गावे पाशी शेतकऱ्यांचा आंदोलन झालं ..
कापूस उत्पादक शेतकरी पारोळा व अमळनेर तालुक्यातील सडावन, रत्ना पिंपरी, दबा पिंपरी ,बिलाली, कनेरे ,कंकराज कोड पिंपरी, येथील शेतकरी मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलनात उपस्थित होते.


शेतकऱ्यांच्या कापसाला दहा ते बारा हजार रुपये प्रत्येक क्विंटल हमीभावाने कापूस फेडरेशनने खरेदी करावा
व केंद्रातील भाजप सरकारने ऑस्ट्रेलिया सरकारचे करार करून ऑस्ट्रेलिया मधून लाखो कापसाच्या गाठी आयात करण्यात सुरू आहे
व आयातीवर 11% सुद्धा टॅक्स केंद्रातील मोदींच्या भाजप सरकारने माफ करून टाकलेला आहे
आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे कापसाचे भाव पाडण्यात आले .
दक्षिण भारतातील कापड लोबीच्या दबावामुळे व साठलोठामुळे केंद्रातील भाजप सरकारने कापूस आयात केला
हा शेतकऱ्यांवर केलेला फार मोठा अन्याय आहे ..
त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आक्रमक झालेले होते..
आता या राज्यातील ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन विरोधी पक्षांमध्ये असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते
परंतु आता ते सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही शेतकऱ्यांचा कापसाचा विषय त्यांना माहितीच नाही असा ते दाखवत आहेत
परंतु शेतकऱ्यांचं जे काही भाजप सरकारने कंबरडा मोडलं
शेतकऱ्यांचा जो विश्वासघात केला त्याला शेतकरी वर्ग धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही
इंडोनेशिया मलेशिया मधून मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेल आयात करण्यात आलं त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांचा तीळ भुईमूग करडी सोयाबीन मका यांचे भाव पाडण्यात आलं ..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
आता शेतकरी वर्ग कष्टकरी वर्ग त्याचप्रमाणे देशातील जनता पूर्णपणे भाजप सरकारला वैतागलेली आहे ..
देशांमध्ये फार वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे.
यासाठी शेतकरी कष्टकरी बांधवांनी या भाजप सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष करावा ..
असा या मोर्चामधील नेत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या…
सतीश पाटील, भडगाव तालुका प्रतिनिधी ,एम. डी. टी. व्ही..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here