दाजीपूर ते राधानगरी वाहतूक मार्गात १ एप्रिल पासून बदल..

0
142

कोल्हापूर :२४/३/२३

देवगड-निपाणी-कलादगी रस्ता रा.मा.क्र. १७८ वर कि.मी. ६६/० ते १३६/६०० या लांबीमध्ये हायब्रीड ॲन्युटी या योजनेअंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण, काँक्रीटीकरण, मोऱ्या व लहान पुलांच्या पुनर्बांधणीचे काम दि. १ एप्रिल ते दि. ३१ मे २०२३ दरम्यान करण्यात येणार आहे.

त्यामुळे या कालावधीसाठी दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करुन वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.


दाजीपूर ते राधानगरी रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीस बंद करुन हलक्या व लहान वाहनाकरीता बालिंगा-महेपाटी कोते-धामोड-शिरगाव-तारळे पडळी-कारीवडे-दाजीपूर-ओलवण प्रतिमा क्र. २९ चा वापर करावा.

मुदाळतिट्टा मार्गे येणारी हलकी व लहान वाहने सरवडे-सोळांकूर-राधानगरी (स्वरुप लॉज जवळून) राधानगरी महाविद्यालय-पिरळ पूल-मार्ग प्रजिमा २९ वरुन व कोकणातील वाहने फोंडा घाट-दाजीपूर-कारीवडे-पडळी-पिरळ पूल-राधानगरी या मार्गाने वळवावीत.

तसेच अवजड व मोठी वाहतुक रस्त्यावरुन पुर्णपणे बंद करुन कोकणातून कोल्हापूरकडे येणारी अवजड वाहने फोंडा-कणकवली फाटा-नांदगाव-तरेळे वैभववाडी-गगनबावडा मार्गे कोल्हापूर अशी वळविण्यात येत आहे.

कर्नाटकातून येणारी अवजड वाहने कोकणामध्ये जाण्याकरीता मुदाळतिट्टा- आजरा – आंबोली – सावंतवाडी अशी वळविण्यात येत आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/36S6BFu
नागरीकांच्या व वाहन चालकांच्या माहितीसाठी योग्य ठिकाणी दिशाचिन्हे व माहिती लावण्यात यावी.

अशा आवश्यक उपाययोजना पोलीस अधीक्षक, कोल्हापूर, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग, कोल्हापूर व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांनी याबाबत एकत्रितपणे कराव्यात, असे ही आदेशात नमुद आहे.

सारिका गायकवाड,जिल्हा प्रतिनिधी, कोल्हापूर एम. डी. टी. व्ही. न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here