शिर्डी येथे उद्या आरपीआय (आठवले ) गटाचा महामेळावा

0
469

नंदुरबार जिल्ह्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने जाणार

नंदुरबार : – रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडिया (आठवले ) महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महामेळावा अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे उद्या रविवारी दि.२८ रोजी सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या महामेळाव्याला नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, जिल्हा सरचिटणीस राम साळूंके, युवा जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील व नंदुरबार लोकसभा मतदारसंघ जिल्हा प्रमुख अनिल कुवर यांनी दिली.

शिर्डी येथील या महामेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले व महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अहमदनगर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय व राज्यातील मान्यवर नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

महामेळाव्यास रिपब्लिकन पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने महामेळाव्यास हजर राहावे. तसेच आपल्या जिल्ह्यात पोस्टर, होर्डिंग, वॉल पेंटिंग, झेंडे लावावे असे आवाहन करण्यात आले आहे.महामेळावा यशस्वी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष राजा सरोदे, सरचिटणीस गौतम सोनवणे, कार्याध्यक्ष बाबुराव कदम, स्थानिक संपर्क श्रीकांत भालेराव अहमदनगर प्रभारी, विजय वाकचौरे, बाळासाहेब गायकवाड, राजा कापसे, सुरेंद्र थोरात, सुनील साळवे आदि प्रयत्नशील आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

दरम्यान, या महामेळावा उपस्थित राहण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील रिपाई कार्यकर्ते व पदाधिकारी यांची बैठक शहादा रेस्ट हाऊसला झाली. या बैठकीस आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस राम साळूंके, युवा जिल्हा अध्यक्ष सुभाष पानपाटील, बापु महिरे (अक्कलकुवा तालुकाध्यक्ष), भिकूलाल ढोडरे (तळोदा तालुकाध्यक्ष), साहेबराव ईशी जिल्हा संघटक, भाईजी सामुद्रे तालुकाध्यक्ष, राजु बिरारे,प्रकाश गुलाले व शाखांचे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here