भात नदीवर होणार 79 लाखांचा गेटेड बंधारा : बाळासाहेब भदाणे

0
222

धुळे -१४/६/२३

कापडणे-धनूरदरम्यान भात नदीवर ७९ लाखांच्या बंधाऱ्यास मंजुरी मिळाली. दोन्ही गावांजवळून वाहणाऱ्या भात नदीवर गेटेड सिमेंट काँक्रिट बंधारा बांधला जाणार आहे.

बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे व जिल्हा परिषद सदस्या शालिनी भदाणे यांच्या प्रयत्नाने बंधाऱ्याच्या कामास मंजुरी मिळाली.

भात नदीवर हा गेटेड बंधारा झाल्यानंतर परिसरातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे

हे सुध्दा वाचा

शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEWS

कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार मध्यान्ह भोजन : पालकमंत्री डॉ.गावित – MDTV NEWS

कापडणे व धनूर गावाजवळून वाहणाऱ्या भात नदीवर असलेले काही बंधारे क्षतिग्रस्त अवस्थेत आहेत. जीर्ण झालेल्या बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणी संचयित होत नाही.

या मागणीची दखल घेत, बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे व जिल्हा परिषद सदस्या शालिनी भदाणे यांनी या बंधाऱ्याच्या कामासाठी शासनस्तरावर भक्कम पाठपुरावा केला. परिणामी या बंधाऱ्याच्या कामास शासनस्तरावरून नुकतीच मंजुरी मिळाली. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत या कामास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

कापडणे-धनूर येथील भात नदीवर ७९ लाख ४२ हजार खर्चून गेटेड सिमेंट काँक्रिट बंधारा आकारास येणार आहे. या बंधाऱ्यामुळे कापडणे-धनूर परिसरासह लोणकुटे, खाज्या नाईकनगर, दापुरा-दापुरी आदी भागातील जलपातळी वाढण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

“सिंचन हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. या प्रश्नावर काम करण्यात मोठे समाधान मिळते. धुळे ग्रामीणमधील, बोरी पट्ट्यातल्या अनेक गावांमध्ये लहान-मोठे बंधारे तसेच पाटचाऱ्या-उपपाटचाऱ्यांची कामे झाल्याने पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठा हातभार लागला आहे. धुळे ग्रामीणमधल्या इतर गावांमध्ये वर्षानुवर्षे सिंचनाचा अनुशेष आहे. सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी, भविष्यात प्राधान्याने प्रयत्न राहतील.” 

-बाळासाहेब भदाणे, प्रथम लोकनियुक्त सरपंच, बोरकुंड

दिलीप साळुंखे धुळे प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here