सुरक्षिततेच्या उपाययोजना व प्रबोधन करणे महत्वाचे : नरहरी झिरवाळ

0
235

आदिवासी बांधव शिक्षण व रोजगाराच्या निमित्ताने शहरात येत असतात. त्यावेळी त्यांच्या निवाऱ्याच्या व्यवस्थेसोबतच त्यांची सुरक्षितता लक्षात घेवून सजगता बाळगण्याबाबत उपाययोजना व प्रबोधन होणे महत्वाचे आहे. त्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेवून प्रयत्नपूर्वक नियोजन करावे, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत मखमलाबाद येथे स्विकार तथा संशोधन केंद्र इमारतीचा भूमीपूजन आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याहस्ते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थित पार पडले. यावेळी श्री झिरवळ बोलत होते. कार्यक्रमास आमदार हिरामण खोसकर, राहुल ढिकले, आदिवासी विकास आयुक्त लिना बनसोड, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त तुषार माळी, संदीप गोलाईत, आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विजय पाटील, कार्यकारी अभियंता एस. एस. सांगळे, नाशिक एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी जतिन रहमान यांच्यासह आदिवासी विकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित व मान्यवरांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येवून संशोधन केंद्र इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच दिपप्रज्वलन करून क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदिप गोलाईत यांनी केले.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार, नाशिक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here