शहिद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे गुढीसह भगवा ध्वज पूजन..

0
134

मराठी चैत्र नववर्षानिमित्त हिंदू संस्कृतीनुसार बुधवारी सकाळी बालवीर चौकात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे मराठी अस्मितेचे प्रतीक गुढीसह भगवा ध्वज पूजन करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले.


सर्वप्रथम मंडळाचे जेष्ठ सल्लागार सेवानिवृत्त शिक्षक जी.एस. गवळी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक स्व. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले.

त्यानंतर उपस्थित नागरिकांनी बालवीर चौकात मराठी अस्मितेचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेल्या गुढी आणि भगवा ध्वजाचे विधीवतपणे पूजन केले.

याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, कार्याध्यक्ष संभाजी हिरणवाळे, सदस्य भास्कर रामोळे, प्रा. एकनाथ हिरणवाळे, विशाल हिरणवाळे गोपाळ गवळी, धीरेन गवळी आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

जीवन पाटील,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here