यादवराव सावंत यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर..

0
151

.हे आहेत एम डी टी व्हीचे शिंदखेडा येथील प्रतिनिधी आणि अभ्यासू व प्रेमळ पत्रकार ..

शिंदखेडा /धुळे -२४/४/२३

येथील बी के देसले नगर रहिवासी यादवराव सावंत यांना संभाजीनगर ( औरंगाबाद ) येथील साहित्यधारा बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने २५८५ ची बुद्ध जयंती उत्सव निमित्ताने राज्यस्तरीय ” उत्कृष्ट पत्रकारिता” पुरस्कार जाहीर झाला असून त्याचे निवडपत्र आयोजक संघर्ष सावळे यांनी पाठवले आहे.

स्थळ – दि. २९ एप्रिल रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र संभाजीनगर येधे प्रदान केला जाणार आहे.

यादवराव सावंत हे २५ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत.

त्या माध्यमातून कार्य करीत असताना सामाजिक, शैक्षणिक व साहित्य क्षेत्रात देखील कवितेच्या माध्यमातून विविध साहित्य संमेलनात देखील उल्लेखनीय कार्य करीत असता..

मागील गोवा राष्ट्रीय प्रवासी कवी संमेलनासाठी निवड देखील झाली होती.

सदर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात देखील त्यांचे कवितेचे सादरीकरण होणार आहे.

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल सर्वच स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

आमचे एम डी टी व्हीचे शिंदखेडा येथील प्रतिनिधी आणि अभ्यासू व प्रेमळ पत्रकार आहेत ..
लेखणी आणि बातमी संकलन यात त्यांचा हातखंडा आहे ..
एम डी टी व्ही च्या शिंदखेडा वृत्त संकलनात आणि कव्हरेज करण्यात त्यांचा उत्साह दांडगा आहे ..
त्यांच्या या निवडीबद्दल आमचे मुख्य संपादक धर्मेद्र पाटील यांच्यासह कार्यकारी संपादक जीवन पाटील ,मुख्य व्यवस्थापक रोहित पाटील, नाशिक जिल्हा प्रतिनिधी तेजस पुराणिक यांच्यासह एम डी टी व्ही न्यूज परिवारातून आनंद व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन करण्यात आले ..
त्यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय ..
आपल्या पुढील वाटचालीस एम डी टी व्ही च्या हार्दिक शुभेच्छा ..
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो,नंदुरबार /धुळे ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here