नेर: साक्री येथील श्रीमती विमलबाई उत्तमराव पाटील कला व कै.डॉ.भास्कर सदाशिव देसले विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास विभाग व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विद्यार्थी विकास विभाग यांच्या शैक्षणिक वर्ष 2022- 23 मधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थसहाय्य योजना अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.एस.सोनवणे यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आला.
यावेळी प्राचार्य सोनवने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यापीठाने आणि महाविद्यालय यांनी राबविलेल्या या योजनेमुळे ज्या विद्यार्थ्यांचे मयत आई/वडील, नि: समर्थ (अपंग) व दारिद्र्यरेषेखाली आहेत अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी हातभार लागत असतो. तसेच अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा व आपल्या जीवनात यशस्वी व्हावे असे श्री देसले यांनी यावेळी सांगितले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या योजनेत एकूण ११ मुले व २ मुली असे एकूण १३ लाभार्थी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्याने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेच्या सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, विद्यार्थी विकास अधिकारी, सहाय्यक अधिकारी, महिला अधिकारी, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी केले.
दिलीप साळुंके, एम.डी.टी.व्ही. न्युज धुळे.