साक्री पोलिसांनी आवळल्या अज्ञात चोरट्याच्या मुसक्या ..

0
386

एकुण २,४०,८५०/- रु किमंतीचा मुद्देमाल हस्तगत .. साक्री पोलिसांची यशस्वी कामगिरी

साक्री /धुळे -२५/४/२३

दिनांक २४/०४/२०23साक्री पोलीस स्टेशन हद्दीत सन २०२३ मध्ये साक्री परिसरातील अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याने साक्री पोलीस स्टेशन येथील १) अपराध क्रमांक ०२/२०२३ भा.द.वि. कलम ४५४, ४५७, ३८० २) अपराध क्रमांक ०८/२०२३ भादवी कलम ४५७ ३८०, ३) अपराध क्रमांक २९/२०२३ भादवी कलम ३८०, ४५७, ४) अपराध क्रमांक ३५/२०२३ भादवी कलम ४५४, ३८०, ५) अपराध क्रमांक ४५/२०२३ भादवी कलम ४५७. ३८०, ६) अपराध क्रमांक ५२/२०२३ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले ..

1
2


पोलीस अधिक्षक श्री संजय बारकुंड सो, अपर पोलीस अधिक्षक श्री किशोर काळे सो, उप विभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग साक्री श्री प्रदिप मैराळे सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविद्र देशमुख साक्री पोलीस स्टेशन येथील पोसई/रोशन विजय निकम, पोसई प्रसाद दिलीप रोदळ, असई, कैलास रामदास पाटील, असई अशोक निवा पाटिल, पोहेका ७११ संजय गोकुळ शिरसाठ, पोना / २३ अनिल संभाजी शिंदे …पोना / १४८१ शांतिलाल छोटु पाटील, पोकों/९९७ जगदिश यशवंत अहिरे, पोकों/ १६६७ रोहन सुरेश वाघ, यांचे पथक तयार करण्यात आलं ..
सदर आरोपी यांचा शोध घेण्यात आला ..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0


साक्री पोलीस स्टेशन येथील हिस्ट्रीशिटर विजय रमेश दाभाडे वय-२९ वर्ष रा-इंदिरानगर भाडणे, ता-साक्री जि-धुळे यांस पथकाने ताब्यात घेतलं
साक्री पोलीस स्टेशन हद्दीतील दहिवेल, दिघावे, कासारे, साक्री येथे घरफोडी केल्याची कबुली दिली ..
ती दिल्यानंतर त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली…
सदर आरोपी मजकुर यांच्या कडुन खालील नमुद गुन्ह्यात मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला साक्री पोलीस स्टेशन अपराध क्रमांक ०८/२०२३ भादवी कलम ४५७, ३८० मध्ये १०,०००/- रु रोख, ५२ / २०२३ भादवी कलम ४५४, ४५७, ३८० मध्ये १०,०००/- रु रोख अपराध क्रमांक ४५/२०२३ भादवी कलम ४५७, ३८० मध्ये १,५०,००० रु किमंतीचे २५ गॅम वजनाची सोन्याची लगड गोळी २) ७०,८५० रु किमंतीचे ९.२१० ग्रॅम वजनाची व एक ४.९६० ग्रॅम वजनाची सोन्याची लगड लांबट आकार असलेली हस्तगत करण्यात आली ..
एकुण २,४०,८५०/- रु किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय ..
जितेंद्र जगदाळे ,साक्री प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here