नंदुरबार : महात्मा ज्योतिबा फुले व विश्ववंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त नंदुरबार येथील समता युवा मंच तथा विश्ववंदनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती कोरिट नाका परिसरच्या वतीने दिनांक ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता कोरीट नाका परिसर येथे वंदना महामानवास या प्रबोधनात्मक संगीतमय महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
या कार्यक्रमात कला, क्रीडा, सामाजिक, राजकीय, साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था व संघटना यांचा राज्यस्तरीय समतारत्न व समता भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन तथा पुरस्कार वितरण पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमास संसदरत्न खा.डॉ.हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित, अमळनेर मतदार संघाचे मा. आमदार शिरीष चौधरी, डॉ.विक्रांत मोरे, रिपाई जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, चंद्रकांत नगराळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन समता युवा मंच तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन पिंपळे, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सचिव भैय्यासाहेब बाविस्कर, सल्लागार राम साळुंखे, सुभाष पानपाटील, गणेश शिरसाट, जितेंद्र पानपाटील, भैया बाविस्कर, राहुल रामराजे, ऍडव्होकेट प्रेमानंद इंद्रजीत, नंदू मोरे, प्रशांत पाटील, सिद्धार्थ साळुंखे, गौतम पानपाटील, किरण खोकले आदींनी केले आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार