नंदुरबार :- शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव पुढे करून बहुजन समाजातील तरुण तथा बेरोजगार युवकांना हाताशी धरून खोट्या इतिहासाचे दाखले देत जाती धर्माच्या विरोधात विषारी गरळ ओकत असतात. संभाजी भिडे जिथे जिथे व ज्या ज्या परिसरात जातात त्या परिसरातील तरुणांची माथी भडकवून त्या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण करतात. दिनांक १७ जून रोजी संभाजी भिडे हे म्हसावद परिसरात येत असून त्यामुळे जातीय तणावपूर्ण वातावरण तयार होऊ नये म्हणून संभाजी भिडेंना म्हसावद येथील कार्यक्रमास येण्यास बंदी घालावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संभाजी भिडे हे यांनी वढू बुद्रुक या गावातील संभाजी महाराजांची समाधी समाजकंटकाच्या हस्ते उध्वस्त करून तिथे आदिवासी, दलित विरुद्ध इतर तथाकथित सुवर्ण असा वाद उभा केला. त्या वादामुळे तिथे मोठी दंगल होऊन अनेक दलितांचे घरे व संसार उध्वस्त झाले होते. अनेक पोलीस कर्मचारी सुद्धा या दंगलीत जखमी झाले होते.
संभाजी भिडेच्या चितावणीखोर व्यक्तव्यामुळे दोन समाजात कायमस्वरूपी संशयाचे वातावरण वढू बुद्रुक या गावात तयार झाले आहे. असेच वातावरण म्हसावद परिसरात होऊ नये म्हणून त्यांना येण्यास बंदी घालावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन आज विविध संघटनांच्या माध्यमातून निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, श्रमिक मुक्तीदल लोकशाहीचे रंजना कान्हेरे, आंबेडकर स्टडी सर्कलचे चुनीलाल ब्राह्मणे, वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अरुण रामराजे, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब इंदवे ,रघुनाथ बळसाणे ,रतिलाल सामुद्रे, गजेंद्र निकम, कृष्णा कोळी, दादाभाई पिंपळे, केशव राजभोज, सावंत, सुनील सूर्यवंशी, राणीताई गावित, संदीप रामराजे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.