नंदुरबार :- शहरात संत भिमा भोई जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिमा पूजन, विविध क्रीडा स्पर्धा तसेच नेत्र तपासणी शिबिर, वृक्षारोपण, रोप वाटप तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. समस्त नंदुरबार जिल्ह्यातील भोई समाज बांधवांनी संत भिमा भोई जयंती उत्साहात साजरी केली.
नंदुरबार शहरातील कार्यक्रमात नेत्र तपासणी शिबिराला १२५ वृद्ध समाज बांधवांची नेत्र तपासणी केली. यावेळी समाजातील वृद्ध महिलांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे नंदुरबार उपनगर परिसरात विविध वसाहतींमध्ये १०० फळ झाडे लावण्यात आली. मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नितीन जगताप यांनी शंभर फळझाडे उपलब्ध करुन दिली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दि.२४ मे रोजी ५५ युवकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. यावेळी भाजपा नेते डॉ.विक्रांत मोरे यांनी स्वतः रक्तदान करुन शिबिरास सुरुवात केली. दि.२१ ते २५ मे पर्यंत पहाटे योग प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांनी सहभाग घेतला. दि.२२ मे रोजी लहान मुलांकरीता विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात दोनशेहून अधिक मुलांनी सहभाग नोंदविला. दि.२५ मे रोजी महिलांकरीता रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग नोंदविला.
दि.२५ मे रोजी संत भिमा भोई यांचे प्रतिमेेचे पूजन आदिवासी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेद्रकुमार गावीत, माजी जि.प.उपाध्यक्ष राम रघुवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष रविंद्र पवार, रसिकलाल पेंढारकर, पुरुषोत्तम काळे, संतोष वसईकर, मदन मोरे, अरुण बेंद्रे, सुनिल मोरे, रमेश खेडकर, बाबुलाल मोरे आदी उपस्थित होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यानंतर शोभायात्रेस सुरुवात झाली. संत भिमा भोई यांच्यावर आधारीत संगितमय गाणी व ढोल-ताशांच्या गजरात नंदुरबार शहरातील संजय नगर येथून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी माजी आ.शिरीष चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी, किरण चौधरी, भाजपा संघटक सचिव निलेश माळी आदी उपस्थित होते. शहरातील प्रमुख चौका-चौकात शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संत भिमा भोई जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष विक्की नुक्ते, उपाध्यक्ष अजय साठे, सचिव प्रकाश भोई, उपसचिव सुरेश वाडीले, राष्ट्रीय सदस्य रामकृष्ण मोरे, जितेंद्र भोई, राजेंद्र खंडू भोई, डॉ.गणेश ढोले, पंकज खेडकर, संजय साठे, पंकज शिवदे, तुकाराम मोरे, जगदिश साठे, मोहन ढोले, भास्कर भोई, मनोहर जावरे, सागर कन्हेरे, पावबा रामोळे, तुषार भोई आदींनी विशेष परिश्रम घेतले.
एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार.