तळोदा महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती उत्साहात संपन्न..

0
245

तळोदा :२४/२/२३

महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग तथा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांचा संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य एस एन शर्मा उपस्थित होते. प्रारंभिक गाडगेबाबांच्या प्रतिमेस अभिवादन करून सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला.

महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. पंकज सोनवणे यांनी गाडगेबाबांच्या विचारांची शिदोरी विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमास महाविद्यालयातील ज्येष्ठ प्रा ए.डी. धोंडगे, प्रा डॉ एस. आर. गोसावी प्रा जे एन शिंदे, कार्यालयीन अधीक्षक वाय एच पंजाराळे, प्रा पराग तट्टे, प्रा जी एम मोरे तसेच प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक श्री ए पी सूर्यवंशी व बोरद येथील मुख्याध्यापक श्री एन जे सूर्यवंशी उपस्थित होते.

श्री .. ए पी सूर्यवंशी यांनी आपल्या मते प्राध्यापक व सर्व गुरुजन हे विद्यार्थ्यांच्या डोक्यातील दुर्गुण, वाईट विचार दूर करतात व चांगले गुण डोक्यात भरवतात अशा पद्धतीने गाडगेबाबांच्या विचारांचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

विद्यार्थ्यांनी चांगले गुण आत्मसात केल्यास खरी गाडगेबाबा जयंती साजरी केल्यासारखे होईल असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉ महेंद्र माळी ,एल एन पाटील ,श्री आश्विन मगरे, श्री रविभाऊ पाडवी आदींनी परिश्रम घेतले.
महेंद्र सूर्यवंशी,तळोदा प्रतिनिधी,एम. डी. टी. व्ही .न्यूज ,तळोदा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here