सातारा -२३ /६/२३
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दरे (ता. महाबळेश्वर) येथील निवासस्थानी आयोजित बैठकीत सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला.
कांदाटी खोऱ्यातील तरुण रोजगारासाठी मुंबई, ठाणे व पुणे सारख्या शहराकडे जात आहेत. त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी व स्थलांतरित तरुणांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कांदाटी खोऱ्यातील पर्यटन विकास कामांबरोबर येथील शेतकऱ्यांना वनौषधी, बांबू लागवड करण्यावर प्रोत्साहित करुन नवीन उत्पन्नाचे साधन तयार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणी साठ्याची माहिती घेऊन मुख्यमंत्री श्री. शिदे यांनी कोयना जलाशयातील कमी झालेला जलसाठा व जलाशयातील साठलेला गाळ उचलण्याची असलेली संधी पाहता गाळमुक्तधरण योजनेंतर्गत गाळ उचलण्याच्या सूचना दिल्या. महाबळेश्वर येथील सोळशी धरणाचा सर्वेक्षण आराखडा जलदगतीने पूर्ण करण्याचेही निर्देश दिले.
हे सुध्दा वाचा
Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS
नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… |
महाबळेश्वर पाचगणी पर्यटन विकास आराखडा, प्रदूषण नियंत्रण, घाट विकास आराखडा, स्थानिक लोकांना रोजगार निर्मिती, तापोळा विकास आराखडा, महाबळेश्वर येथील पार्किंग, कांदाटी खोरे विकास, प्रतापगड विकास योजना, बेल एअर रुग्णालयाच्या कामांसह विविध विषयांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आढावा घेतला.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,सातारा ..