धुळे: धुळे तालुक्यातील नेर येथील चि. योगेश किशोर खलाणे याचे एम.एस.(M.S.) आर्थोपेडिक या उच्च शिक्षणा साठी निवड करण्यात आली आहे.तसेच स्वर्गीय बापूसो.
हिरामण रतन खलाणे यांचा नातू व श्री. किशोर हिरामण खलाणे (वरिष्ठ लिपिक कन्या हायस्कूल नेर) व सौ. वंदना किशोर खलाणे यांचा चिरंजीव याचे ऑल इंडिया कोट्यामधून B. J. मेडिकल कॉलेज अहमदाबाद या जगप्रसिद्ध मोठ्या कॉलेजमध्ये मिरीट लिस्ट नुसार सिलेक्शन झाले असून चि.योगेश याने महात्मा गांधी मेडिकल कॉलेज वर्धा येथे एम.बी.बी.एस.ची पदवी उत्तीर्ण केली होती.
गेल्या एक वर्षापासून इंटर्नशिप चालू असतांना पुढील शिक्षणाचा अभ्यास करीत होता. व काल लिस्ट जाहीर होऊन त्यांचे या चांगल्या कॉलेजमध्ये निवड झाल्याचे ईमेलद्वारे कळविण्यात आले.
तसेच उद्योजक हिम्मतराव खलाणे व नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे,माजी जि.प.सदस्या सौ.मनिषा खलाणे व्यावसायिक श्री.दिपक खलाणे व शरद खलाणे यांचा पुतण्या आहे.चि.योगेश यांचे नेरसह परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.
MD TV न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे