मार्केटवर आता फडकावू सेनेचा भगवा : मा. आ. चंद्रकांत रघुवंशीचे आवाहन..

0
432

नंदुरबार :२७/३/२३

येत्या काही महिन्यात क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक होऊ घातल्यात ..

त्यापार्श्वभूमीवर नंदुरबार बाजार समिती निवडून आणणं आणि सेनेचा भगवा फडकावून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सेनेची सत्ता स्थापन करण्याचा चंग मा. आ. चंद्रकांत रघुवंशीनीं बांधल्याचं सध्या चित्र नंदनगरीत दिसतंय ..

क्रुषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक संदर्भात शिवसेना नेते धुळे नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख मा, आ, चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, प्रारंभी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मार्केट कमिटी च्या निवडणुक बैठकीत शिवसेना नेते मा आ चंद्रकांत रघुवंशी यांनी मार्गदर्शन केलं ..

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव नितिनभाऊ जगताप यांनी मा आ चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्या कार्यकर्त्या सह शिवसेनेत प्रवेश केला,,,

वकिल माणिक पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष. यांनी ही शिवसेनेत प्रवेश केला..


ह्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख पदी डॉ सयाजीराव मोरे यांची नियुक्ती करण्यात आली ..
तसे नियुक्ती पत्र देण्यात आले ..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अँड राम रघुवंशी. विक्रमसिंह वळवी.डाँ सयाजीराव मोरे. देवमन पवार. हिरालाल भाई पटेल यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले ..
कार्यक्रमास मा.जि.प.अध्यक्ष रमेश वळवी. जेष्ठ मार्गदर्शक शेतकी संघाचे अध्यक्ष बी. के. अण्णा पाटील.,पंचायत समिती सभापती मायाताई माळसे यांच्या सह सरपंच. उपसरपंच.सदस्य.विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन. व्हा.चेअरमन.संचालक. जिल्हा परिषद सदस्य. पंचायत समिती सदस्य .व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ..
कार्यक्रम सी बी, गार्डन येथे आयोजित केला होता ..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश शिंत्रे यांनी केले ..

नारायण ढोडरे ,प्रतिनिधी ग्रामीण ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here