Nandurbar News Today : राहुल गांधींच्या विधानावर भाजपा युवा मोर्चाचा आगळवेगळा निषेध…!

0
165
Separate protest of BJP Yuva Morcha on Rahul Gandhi's statement Nandurbar News Today

Nandurbar News Today : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जातीबाबत खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या विधानावरून भाजपा युवा मोर्चा आक्रमक झाला आहे. नंदुरबार येथे भाजपा युवा मोर्चाच्या वतीने राहुल गांधींच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

भाजपा जिल्हाध्यक्ष मा. श्री. निलेशभाऊ माळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. ( Nandurbar News Today )

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, भाजपा महामंत्री डॉक्टर सपना अग्रवाल, विधानसभा निवडणूक प्रमुख महिंद्र भाई पाटील, जिल्ह्या सचिव भीमसिंगदादा राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष माणिक माळी, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, जिल्हा सचिव मनीषा निकम, महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव सविता जयस्वाल, रेखा चौधरी, सरिता चौधरी, शितल मराठे, अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हाध्यक्ष लियाकत बागवान, सहकार सेल जिल्हा अध्यक्ष के डी गिरासे, शहराध्यक्ष कुशाल चौधरी, शहर उपाध्यक्ष अजय राजपूत, युवा मोर्चाचे जयेश चौधरी,वरुण गावित, सचिन कोटवाय, योगेश शर्मा आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या जातीबाबत “बेतला” वक्तव्य केल्याचा आरोप भाजपने केला आहे. हे विधान मोदी आणि ओबीसी समाजासाठी “अपमानजनक” आणि “असत्य” असल्याचे भाजपाचे म्हणणे आहे. भाजपा युवा मोर्चाने राहुल गांधी यांच्यावर “राजद्रोहाचा गुन्हा” दाखल करण्याची आणि त्यांच्यावर “कठोर कारवाई” करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here