दोंडाईचात भीषण आग, 60 ते 65 लाखांचे नुकसान | Severe fire in dondaicha, loss of Rs 60 to 65 lakh

0
1655
Severe fire dondaicha

दोंडाईचा(Dondaicha): येथील सर्व्हे नंबर ४१५ मध्ये असलेल्या एबीजी सर्जीकल कॉटन फॅक्टरीला दि. २९ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते सव्वादोनच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. राहुल विजय मराठे यांच्या मालकीची ही फॅक्टरी आहे.

आगीत सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही मात्र साठवून ठेवलेल्या सर्जिकल कॉटन आणि मशिनरी जळून खाक झाली आहे. दोंडाईचा पोलिसात अग्नी उपद्रवाची नोंद करण्यात आली आहे. आज दि. 30 रोजी शहर तलाठी संजीव गोसावी यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. या आगीत 60 ते 65 लाखांचे नुकसान झाले आहे…

download

याबाबत राहुल विजय मराठे वय 32 वर्ष, व्यवसाय एबीजी सर्जिकल कॉटन प्रक्रिया उद्योग रा. चैनीरोड दोंडाईचा ता. शिंदखेडा यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शहरातील डाबरी घरकुल शिवारातील असल्याने यांच्याच्या मालकीचे एबीजी सर्जिकल कॉटन प्रक्रिया उद्योग ही कंपनी  रुग्णालयांना वापर होणाऱ्या कॉटन तयार करणारी कंपनी असून काल रविवारी दि. 29 रोजी दोन ते सव्वादोन वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत सर्जिकल कॉटनच्या गठानी भक्ष्यस्थानी पडल्याचे आगीचा भडका उडाला होता.

दरम्यान काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारणेतून मशनरी ही खाक होण्यास सुरुवात झाली. घटनेची माहिती दोंडाईचा नगर परिषदच्या अग्निशमक दलाच्या कळतच तात्काळ अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी तीन ते चार फेऱ्या करुन आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर दुपारी दोन वाजेच्या सुमारास लागलेली ही रात्री दहा वाजेपर्यंत धगधगत होती‌.

या आगीत शंभर ते दीडशे कॉटनच्या गठानी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत. या आगीत कॉटनच्या गटांनी तसेच सर्जिकल कॉटन तयार करणाऱ्या मशनरी हे जळून खाक झाले आहेत यात 60 ते 65 लाखाचे नुकसान झाल्याची नोंद दोंडाईचा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तसेच दोंडाईचा शहर तलाठी संजीव गोसावी यांनी देखील पंचनामा कर केला आहे. पुढील तपास दोंडाईचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण निंबाळे हे करीत आहेत…

✍ समाधान ठाकरे दोंडाईचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here