Nandurbar :१०/०२/२०२३
सरकारी यंत्रणा असो किंवा कुठलीही अन्य यंत्रणा या नेहमीच पाचवीला पूजलेल्या सारखं वागतात.. त्याची प्रचिती आली शहादा तालुक्यातील नांदे या गावात..
हे गाव 100% आदिवासी लोकवस्तीचं असून कित्येक वर्षांपासून गटारीच नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहतंय.. अनेक समस्यांचा सामना या गावकऱ्यांना करावा लागतोय..
प्रशासनाला वारंवार मागणी करून देखील प्रशासनाने पाठ फिरवली आहे. वीरपुर आणि चिंचोरा या गावाकडे जाण्यासाठी नांदे गावातून मार्गस्थ व्हावं लागतं.. मात्र रस्त्यावर वाहणाऱ्या या सांडपाण्यामुळे दुर्गंधी तर पसरतेच पण आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण होतो..
आता गावचा विकास हा कागदावरच राहिला आहे का काय असा प्रश्न या गावकऱ्यांना निर्माण झालाय.. बाराही महिने हे पाणी असंच वाहत राहतं त्यामुळे तक्रारींचा कितीही पाढा वाचला तरी या गावच्या ग्रामपंचायत आणि तेथील बाबून त्याकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र निर्माण झालंय.
अहो कारभारी जरा गावाकडे लक्ष द्या ना, अशी वेळ गावकऱ्यांना म्हणायची आलीय.. आपल्या घरात घाणेरडे पाणी येतं, ग्रामपंचायत च्या आवारात वाहतं, उघड्या डोळ्याने पाहणाऱ्या ग्रामपंचायतला अजून कसे जाग येत नाही हाच एक मोठा यक्ष प्रश्न पडलाय..
त्यामुळे येणाऱ्या काळात तरी ग्रामपंचायतीने लक्ष घालून हा प्रश्न मिटवावा आणि आरोग्याचा प्रश्न दूर करावा ही ग्रामस्थांची मागणी आहे.
शहादाहुन शाम पवार एमडी टीव्ही न्यूज शहर प्रतिनिधी शहादा