शहादा दोंडाईचा-शहादा शिरपूर रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष, रस्ता रोको आंदोलन…!

0
291

शहादा येथील शहादा दोंडाईचा-शहादा शिरपूर रस्त्याचे काम चांगले आणि जलद गतीने करावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आणि सामाजिक संघटनांनी नियोजित प्रमाणे रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून आंदोलनाला सुरुवात झाली असता वन विभाग कार्यालयसमोर रस्त्यावर घोषणा देत रास्ता रोको करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक, राजकीय संघटनांच्या नेत्यांनी आपापले मत मांडले. सुमारे एक तास रास्ता रोको करण्यात आला असून दोन्ही बाजूस वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसल्या.

WhatsApp Image 2023 10 05 at 8.30.20 PM

यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे अभिजीत पाटील, पद्माकर वळवी, राजेंद्र गावित, उदयसिंग कोचरू, लक्ष्मण कदम, अरुण चौधरी तसेच सामाजिक राजकीय संघटनासह हजारो शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी कडक बंदोबस्त लावला होता.

आंदोलनातील महत्त्वाचे मुद्दे:

  • शहादा दोंडाईचा-शहादा शिरपूर रस्त्याचे काम अपूर्ण आहे.
  • रस्त्याची गुणवत्ता खराब आहे.
  • रस्ता लवकर पूर्ण करण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी संबंधित विभागाने कारवाई करावी.
WhatsApp Image 2023 10 05 at 8.33.57 PM

आंदोलनाचा परिणाम:

  • आंदोलनामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली.
  • संबंधित अधिकाऱ्यांना लेखी आश्वासन दिले गेले आहे.
  • रस्ता लवकर पूर्ण करण्यासाठी आणि त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी संबंधित विभागाने कारवाई करण्याची शक्यता आहे.

बातमीतील महत्त्वाचे मुद्दे:

  • आंदोलनाचे कारण: शहादा दोंडाईचा-शहादा शिरपूर रस्त्याचे काम चांगले आणि जलद गतीने करावे.
  • आंदोलनाचे नेतृत्व: शेतकरी संघर्ष समिती आणि विविध सामाजिक संघटना.
  • आंदोलनाचे स्वरूप: रास्ता रोको.
  • आंदोलनाचा परिणाम: संबंधित अधिकाऱ्यांना लेखी आश्वासन दिले गेले आहे.

संजय मोहिते, शहादा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here