शहादा /नंदुरबार -२१/७/२३
अहिंसाच्या भारत देशात सकल दिगंबर जैन समाजाच्या आस्थाचे केंद्र असलेले प्रसिद्ध जैन संत आचार्य कुंतूसागर जी महाराज यांचे शिष्य आचार्य काम कुमार नंदी मुनी महाराज यांची कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील हिरे कुड आश्रमातून पाच जुलै रोजी अपहरण करण्यात आलं होतं.. शरीराला करंट देऊन निर्गुण हत्या काही समाजकंटकांनी केली. या निंदनीय घटनेने देशातील सकल जैन समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून या संताप जनक घटनेचा निषेध करण्यासाठी जैन धर्म जैन तीर्थक्षेत्र जैन साधुसंत व जैन समाजाच्या संरक्षणाच्या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील शहादा सकल जैन समाजातर्फे हाताला काळ्याफिती बांधून मूक मोर्चा द्वारे तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या.. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात अहिंसा चौक ते उपविभागीय कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसीलदारांना या संदर्भातील निवेदन सादर करण्यात आलं.. यावेळी शहादा जैन सकल समाजाचे विविध पदाधिकारी बांधव भगिनी उपस्थित होत्या…
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सकल जैन समाजाच्या वतीने तहसीलदारांच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या संदर्भातले निवेदन सादर करण्यात आलं.. . झालेली घटना अतिशय निंदनीय असून महाराजांची तर घटना होऊन गेली पण भविष्यात कोणते धर्माच्या साधुसंतांच्या बाबतीत अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नये तसेच या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी ही मागणी सकल जैन समाज बांधवांनी शहादा शहरात तहसीलदारांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.. सदर आरोपींना कठोर शिक्षा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील सकल जैन समाज बांधवांनी दिला आहे.. या घटनेमुळे संपूर्ण देशभरातील जैन समाज बांधवांच्या भावना दुखावल्याने त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना पाहायला मिळत आहे..या मूक मोर्चात ज्येष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटीया, विनय गांधी, पारसलाल देसरडा, सुमितलाल जैन, मोतीलाल जैन, विनोद जैन, समीर जैन, मयुर जैन, कचरूलाल नहाटा, प्रदीपचंद पारख, डॉ. राजेश जैन, भवरलाल जैन, रमेश जैन, राजेंद्र भटुलाल अग्रवाल, पिनाकिन पटेल, गुलाबचंद जैन, राकेश जैन आदी मान्यवरांचा समावेश होता ..
शहाद्याहून जगन ठाकरेसह संजय मोहिते एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार