दीपकबापू पाटील यांच्या नेतृत्वात शहादा खविसं निवडणूक बिनविरोध

0
136

शहादा : येथील तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या २१ जागांसाठी ५५ इच्छुकांपैकी ३४ उमेदवारांनी माघार घेतल्याने सर्व २१ जागा बिनविरोध झाल्या आहेत. सातपुडा कारखान्याचे अध्यक्ष दिपकबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी गटाने सर्वांचे सहकार्य व सांघिक प्रयत्नाने खरेदी विक्री संघावर आपली सत्ता कायम राखली आहे.

‘अ’ वर्ग सहकारी संस्था प्रतिनिधीच्या १० जागांसाठी १७ उमेदवारांपैकी ७ उमेदवारांनी माघार घेतल्याने या दहाही जागा बिनविरोध झाल्या आहेत. ‘ब’ वर्ग सहकारी संस्था प्रतिनिधीच्या ६ जागांसाठी २७ उमेदवारांपैकी २१ उमेदवारांनी माघार घेतल्याने सर्व सहा उमेदवार बिनविरोध झाले आहेत. महिला राखीव प्रतिनिधीच्या २ जागांसाठी ३ उमेदवारांपैकी एका उमेदवाराने माघार घेतल्याने या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या आहेत. इतर मागासवर्गीय प्रतिनिधीच्या एका जागेसाठी ६ उमेदवारांपैकी ५ उमेदवारांनी माघार घेतल्याने ही जागा बिनविरोध झाली. अनुसूचित जाती/जमाती आणि भटक्या विमुक्त जाती/जमाती मतदारसंघाच्या एका जागेसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केला होत. त्यामुळे ह्या दोन्ही जागा बिनविरोध झाल्या.

निवडून आलेले उमेदवार…

‘अ’ वर्ग सहकारी संस्था प्रतिनिधी उमाकांत तुकाराम चौधरी (कुढावद), विनोद जाधव चौधरी (कवठळ त.श.), अनिल अशोक पाटील (म्हसावद), अरविंद सुदाम पाटील (पुसनद), गणेश उत्तम पाटील (शहादा), दिलिप ज्ञानदेव पाटील (प्रकाशा), मकरंद नगीन पाटील (शहादा), यशवंत रोहिदास पाटील (शिरूड), रविराज रमाकांत पाटील (कलमाडी त.बो.) व संजय विक्रम पाटील (सुलवाडे).

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

“ब” वर्ग व्यक्तीशः सभासद प्रतिनिधी- शिवदास काशिनाथ चौधरी (बामखेडा त.त.), रविंद्र विठ्ठल चौधरी (धुरखेडा), शरद शिवदास- पटेल (मनरद), अरविंद जगन्नाथ पाटील (पाडळदा), यतेंद्र नरेंद्र पाटील (डामरखेडा) व हिरालाल दत्तु पाटील (मोहिदे त.श.).

महिला राखीव प्रतिनिधी- रेखाबाई दिनानाथ पाटील (लांबोळा) व साधनाबाई सखाराम पाटील (बिलाडी त.सा.)
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी- अंबालाल काशिनाथ पाटील (ब्राम्हणपुरी)
अनुसूचित जाती/ जमाती प्रतिनिधी- देविदास रुबाबसिंग पवार (पिंपळोद)
भटक्या विमुक्त जाती/जमाती प्रतिनिधी- नरेंद्रसिंह विजयसिंह गिरासे (जावदे त. ह.)

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा निबंधक भारती ठाकूर यांनी काम पाहिले. त्यांना खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक अनिल पाटील सहकार्य केले.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here