शहादा /नंदुरबार 24/7/23
नुकतच चंद्रयानाने अवकाशात झेप घेतली आणि भारतीयांनी एकच जल्लोष केला होता.. लवकरच ते चंद्रावर स्थिरावेल आणि तेथील फोटो भारताला पाठवेल हे शास्त्रज्ञांचे यश ठरेल मात्र या चंद्रयानालाही गोंधळात टाकावे अशी स्थिती सध्या शहादा -सारंगखेडा रस्त्याची झाली आहे.. या रस्त्यावरील खड्डे पाहून चंद्रयानाच्या कॅमेरात टिपले गेले आणि काही क्षण चंद्रयानही गोंधळले असावे.. या रस्त्यावरून चंद्रासारखी खड्डेमय स्वरूपातील फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल केले जात आहे.. सारंखेडा ते शहादा रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे.. रस्त्यावर असणाऱ्या खड्ड्यांचे रूपांतर पाण्याच्या डबक्यासारखं झाला आहे.. सामान्य नागरिकांना येता-जाता अतोनात त्रास सहन करावा लागतोय.. सध्या या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या चालकांनी मोबाईल कॅमेरात टिपलेले हे चित्र इतके भयावह आहे की या रस्त्यावरून कसे जाता येत असेल याची कल्पना न केलेली बरी.. प्रमुख दोन राज्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची स्थिती देखील अतिशय गंभीर झाली आहे..
आता संबंधित विभागाने आणि प्रशासनाने याकडे लक्ष वेधणे आवश्यक असल्याचं येथील स्थानिक रहिवाशांसह वाहनधारकांनी एमडीटीव्हीच्या माध्यमातून व्यक्त केल आहे… या रस्त्यावरून वाट काढताना जीव धोक्यात घालणं हे म्हणणे वावगे ठरू नये.. रस्त्याची अवस्था अनेक वर्षांपासून जैसे थे आहे दरवर्षी या रस्त्यावर किरकोळ कामे करून लाखो रुपये काढले जातात मात्र रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळते.. राष्ट्रीय महामार्ग विभागाने चौपदरीकरणाची वाट न पाहता एकच वेळ दर्जेदार रस्त्याची काम करावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.. हे फोटो पाहून आता तरी प्रशासनाला जाग येते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल… ज्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हा विषय आहे तो विभाग पाचवीला पूजलेलाच म्हणायचा..
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता प्रभाकर वळविंच्या म्हणण्यानुसार बहुतांशी रस्ता सुव्यवस्थित असून काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात खड्डे पडल्याने ठेकेदारांना दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत.. मात्र वेळ काढूपणाचे हे लक्षण असल्याने वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाशी या रस्त्याच्या माध्यमातून खेळ खेळला जातोय तो आता तरी थांबावा हीच अपेक्षा.. या संपूर्ण दयनीय रस्त्याचा थेट आढावा घेतलाय सारंगखेडा ते शहादा रस्त्यावरून शहादा प्रतिनिधी जगन ठाकरेंसह संजय मोहिते यांनी..
आमचे दोन्ही प्रतिनिधी या प्रश्नाला हात घालून हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे सरसावले असल्याने नागरिकांनी एम डी टीव्ही न्यूजच्या पुढाकाराबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.. प्रतिनिधींचे कौतुक केले तेवढे थोडेच..
संजय मोहितेंसह जगन ठाकरे शहादा एम डी टीव्ही न्यूज नंदुरबार