नंदुरबार :- तालुक्यातील शनिमांडळ येथे शनैश्वर जयंती सुवर्णमहोत्सव वर्षनिमित्त शनी मंदिराचा कलशरोहन व गुरू महादेव प्राणप्रतिष्ठा आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनैश्वर ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने दि.११ मे २०२३ रोजी सकाळी ८ वाजता शनिदेवता कलश गुरू महादेवाची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तर दि.१२ मे रोजी गुरूमहादेव प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना तसेच दि.१३ मे रोजी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाला सुरूवात करण्यात येणार आहे. यानिमित्त दररोज पहाटे काकडा आरती, पारायण, हरिपाठ, किर्तन होणार आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दि.१३ मे रोजी ह.भ.प.श्याम महाराज ढाड्रेकर यांचे किर्तन, दि.१४ रोजी ह.भ.प.पांडुरंग महाराज मालपूरकर, दि.१५ मे ला ह.भ.प.मुरलीधर महाराज कंढरेकर, दि.१६ मे ला ह.भ.प.महेंद्र महाराज शनिमांडळकर, दि.१७ मे रोजी ह.भ.प.यशवंत महाराज कळमगांव, दि.१८ रोजी ह.भ.प.गांगुर्डे महाराज धुळे, दि.१९ ला ह.भ.प.जयराम बाबा, गोडेगांव, दि.२० मे रोजी ह.भ.प.जयराम बाबा गोडेगांवकर यांच्या काल्याच्या किर्तनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार असून त्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गावकर्यांतर्फे करण्यात आले आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार