शरद पवार यांनी जाणून घेतला नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय आढावा !

0
188

नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी मुंबईत घेतली खा.शरद पवार यांची भेट

नंदुरबार :- राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा जाणून घेत नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांची माहिती घेतली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संघटन व काम वाढविण्यावर भर देण्याविषयी पदाधिकाऱ्याना मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार यांना आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे प्रतीक असलेले धनुष्यबाण देऊन सन्मानित केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पवार, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष दानिश पठाण, जि.प.सदस्य मोहन शेवाळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय खंदारे, शहादा तालुका अध्यक्ष चिंतामण पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, नंदुरबार तालुकाध्यक्ष मधुकर पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते माधव पाटील, शहादा तालुकाध्यक्ष डॉ. जितेंद्र भंडारी, रवींद्र वळवी, ओबीसी सेलचे नंदुरबार शहर कार्याध्यक्ष कमलेश चौधरी आदी उपस्थित होते.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

यावेळी खा. शरद पवार यांनी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुका संदर्भातील व्युव्हरचना जाणून घेतली. या निवडणुकांसाठी आतापासूनच कामाला लागून राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यावर भर द्यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच आगामी निवडणुकांसाठी इच्छुकांची मते देखील जाणुन घेण्यात आली.

एम.डी.टी.व्ही. न्युज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here