SHINDKHEDA CRIME:मोटारसायकल चोरट्यांचा वाढता धुमाकूळ , नागरिक त्रस्त ,पोलिसांसमोर आव्हान ..

0
381

शिंदखेडा /धुळे -२१/७/२३

शिंदखेडा शहरात सध्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय .. चोरट्यांचा धुमाकूळ वाढतोय .. नुकतंच लक्ष्मीनारायण कॉलनीतील रहिवासी मोहिनेश भगवान हिरे यांची घरासमोर लावलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH.41P.4558 दिनांक 14 जुलै च्या रात्री चोरट्यांनी पळवली.
त्यांनी आपबिती कथन केली कि ,सकाळी उठल्यावर मला लावलेल्या ठिकाणी मोटरसायकल दिसुन आली नाही.. म्हणुन आजुबाजुला शोधाशोध केली असता आढळून आली नाही .. म्हणून मला खात्री पटली की माझी मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सदर मोटरसायकल काळा कलरची असून तिच्यावर निळा पट्टा आहे. सदर मोटरसायकल घरासमोर हँडल लॉक करून लावलेली होती. चोरीची प्राथमिक सूचना रिपोर्ट शिंदखेडा पोलीस स्टेशनला काल ( 20 जुलै ला ) करण्यात आली असून पुढील तपास पो.हे.को.एकलाख पठाण करित आहेत.
स्टेशन रोडवरील युनिकोन मोटरसायकल चोरीचा सीसीटीव्ही फुटेज सामाजिक माध्यमातून व्हायरल झाला होता .. त्यात लाल कलरची फोर व्हीलर गाडीतून चोर आले व मोटरसायकल पळूवून नेली होती.शिंदखेडा शहरात मोटरसायकल चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून यावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व रेल्वे प्रवासीचे दादा मराठेसह नागरिकांकडून केली जात आहे ..
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here