एक लाखावर मुद्देमाल जप्त..
धुळे -२४/७/२३
शिंदखेडा तालुक्यातील मेथी गाव शिवारातील स्मशानभूमी जवळील बाभळीच्या झाडे झुडप्याच्या आडोशाला तिन पत्ती ( तिर्रट ) जुगार अडडयावर पोलिसांनी छापा टाकला .. शिंदखेडा पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गोरावडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने काल दि. 23-07-23 रोजी 14-30 वाजता छापा टाकुन 1,08, 710 चा मुद्देमाल जप्त केला ..
सहाही जुगार खेळणाऱ्या आरोपींना शिताफीने अटक केली आहे. मेथी ता.शिंदखेडा येथील स्मशानभूमी जवळील बाभळीच्या झाडे झुडपांच्या आडोशाला तिन पत्ती ( तिर्रट ) जुगार खेळला जातो अशी गुप्त माहिती शिंदखेडा पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गोरावडे यांना सदर ठिकाणी छापा टाकणेकरिता आदेशीत केले. सदर छापा करणेसाठी पोस्टई मिलिंद पवार, पोहेकॉ एकलाख पठाण, पोना.चेतन कंखरे , पोकॉ. कैलास चौधरी, कैलास पुरोहित, पासोना नागेश शिरसाठ यांना सोबत घेतले .. चिमठाणा दुरक्षेत्र येथे जावुन तेथील नेमणुकीचे पोकॉ. किरण पारधी यांचे मदतीने दोन पंचाना सोबत घेऊन छापा कारवाई चे ठिकाणी सरकारी वाहनाने मिळालेल्या माहितीनुसार पथक दाखल झाले ..
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
मेथी ता. शिंदखेडा गाव शिवारातील दोंडाईचा- चिमठाणा रोडलगत हॉटेल चेतेश्वर च्या समोर रोडवर वाहने उभि करून रस्त्याच्या जवळील मेथी शिवारातील स्मशानभूमी लगत बाभळीच्या झाडे झुडपांच्या आडोशाला एक इसम काही इसमासोबत जमिनीवर बसुन 52 पत्त्यावर पैसे लावून तिन पत्ती ( तिर्रट ) नावाचा जुगाराचाखेळ खेळला जात होता. छापा टाकला असता सदर इसमानि पळ काढला. तेव्हा दोघांना जागिच पकडले असता त्यांची नावे व पत्ता विचारले असता , 1) सदु बाबु सुर्यवंशी ( वय- 36 ) रा.मेथी ता.शिंदखेडा 2) राजेंद्र भिला बच्छाव ( वय – 57 ) रा.मेथी ता.शिंदखेडा समोर आली ..
झडती घेतली असता सदु सुर्यवंशी कडे 1 हजार रुपये व 15 हजार किमतीचा मोबाईल तर राजेंद्र बच्छाव कडे 350 रोख व 15 हजार किमतीचा मोबाईल तसेच 16 हजार किमतीचा मोबाईल थोडक्यात आढळला, 440 किमतीचे पत्यांचि गड्डया , 500 किमतीचि एक पाण्याचा जार , 400 रुपये किमतीचि एक चटई, 10 रुपये चि दोन पेना , 10 रुपये चे कोरे कागद , 60 हजार किमतीचि फॅशन प्रो. मोटरसायकल असा एकुण 1,08,710 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. तसेच तेथुन पसार झालेल्यामध्ये 1) राजु सोनवणे 2) दौलत माळी 3) अरविंद दाजमल भिल रा.मेथी ता.शिंदखेडा 4) पिंटु माळी रा.कढरे असे इसम जुगार खेळत असल्याचे सदु सुर्यवंशी यांनी सांगितले. आपले स्वतः चे फायद्यासाठी लोकांकडून तिन पत्त्याचा खेळ खेळताना, खेळवितांना सदु सुर्यवंशी सापडून आला..
त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस स्टेशन ला मु.जु.का.क. 12 ( अ ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद पोकॉ. विनोद जनार्दन बर्डे दुरक्षेत्र चिमठाणे यांनी दिली आहे. सदर सर्व आरोपींना अटक करण्यात आली. नव्याने शिंदखेडा पोलीस स्टेशनला रुजु झालेले पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहिलिच धडक कारवाई झाल्याने अवैध धंद्यांना चपराक बसली आहे.
यादवराव सावंत ,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,धुळे