विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२वी जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीमार्फत १४ एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या जयंतीची कार्यकारणी गठित करण्यात आली. त्यात संजय अभिमन पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत १४ एप्रिल २०२३या वर्षाची विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरी करणेबाबत सर्वपक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी युवा कार्यकर्ते सर्व समाजबांधव व तरुणवर्ग यांच्या उपस्थितीत सर्वांनुमते १४ एप्रिलचा विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी संजय अभिमन पाटोळे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्ष प्रा मधुकर बाबुराव मंगळे, पप्पू अहिरे, प्रा सारनाथ युवराज बोरसे यांची निवड करण्यात आली आहे.
या बैठकीत विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव निमित्ताने बैठकीत दिनांक ११ एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले व दिनांक १४ एप्रिल विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती निमित्ताने प्रश्न मंजुषा आयोजित केली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रश्न मंजुषा तसेच वक्तृत्व स्पर्धा घेण्याचे विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय पाटोळे यांनी संकल्पना मांडली.Bया बैठकीचे अध्यक्षस्थानी अभिमन पाटोळे, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ट्रस्टचे अध्यक्ष शिंदखेडा. बन्सीलाल पितांबर बोरसे, प्रा निरंजन वेंदे, नानाभाऊ पाटोळे, अमृत पाटोळे आदीसह समाजबांधव उपस्थित होते.
उत्सव समितीची खालील प्रमाणे कार्यकारिणी- शिंदखेडा शहर अध्यक्ष :संजय अभिमन पाटोळे, उपाध्यक्ष प्रा मधुकर बाबुराव मंगळे, उपाध्यक्ष पप्पू अहिरे, उपाध्यक्ष प्रा सारनाथ युवराज बोरसे, सचिव प्रा निरंजन वेंदे, खजिनदार विनोद पोपट पाटोळे, कायदेशिर सल्लागार ॲड. अरविंदकुमार मंगासे, ॲड. चंद्रकांत बैसाने, सल्लागार प्रा. दत्तात्रेय धिवरे, शशिकांत आण्णा बैसाणे, प्रा.सुनील थोरात, प्रकाश नगराळे, राहुल महिरे, भूषण नगराळे, कमलेश पाटोळे, संतोष कापुरे, प्रभाकर पाटोळे, दिनेश मोरे, साहेबराव पाटोळे, मंगलप्रसाद पाटोळे, प्रा. भूषण इंजे, विजयभाऊ मोरे, राहुल पाटोळे.
कार्यकारिणी सदस्य:– छगन पाटोळे, रवींद्र पाटोळे, रवींद्र मोहिते, बबलू कापूरे, पंकज मोहिते, मिलिंद पाटोळे, सिद्धार्थ बोरसे, संदीप पाटोळे, गणपत पाटोळे, दगा मंगळे, राजू शिरसाठ, विश्वास पाटोळे, साजन पाटोळे, उमाकांत पाटोळे, किरण पाटोळे, राहुल देवरे, हर्षदीप वेंदे, अजय पानपाटील, भैया बाबुराव पाटोळे, कैलास पोपट पाटोळे, अविनाश बैसाणे, विजय मंगा पाटोळे, सागर थोरात, सनी बोरसे, संजय कुवर, सिद्धार्थ कुवर, अजय बिरहाळे, संजय पानपाटील, नानाभाऊ बोरसे, विजय शिरसाठ, राहुल अशोक पाटोळे, गोपाल अमृतसागर, कुणाल पाटोळे, संतोष पाटोळे, नवनीत नरभवर, अनिल पाटोळे, सुनील पाटोळे आदींची निवड करण्यात आली.
यादवराव सावंत, एम.डी.टी.व्ही.न्यूज शिंदखेडा