शिंदखेडा /धुळे -१८/७/२३
येथील शासकीय विश्रामगृह आवारातील दहा झाडे तर शिंदखेडा बसस्थानक आवारातील 46 झाडे अशी एकुण 56 झाडे तोडण्यास शेतकरी संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे .. नगरपंचायत मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातून म्हटले आहे की, शिंदखेडा शहरातील शासकीय विश्रामगृह व शिंदखेडा बसस्थानक आवारातील झाडे तोडण्यास आमचा विरोध आहे.
दि. 8 जुलैला वृत्तपत्रात वृक्ष तोडण्याची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यात नवीन शासकीय विश्रामगृह बांधकामासाठी 10 झाडांची व शिंदखेडा बसस्थानकात नवीन चार्जिंन स्टेशन उभारण्यासाठी 46 झाडांची तोडण्याबाबतची जाहिरात आली असुन एकुण 56 झाडांची कत्तल कोणत्याच परिस्थितीत होऊ देणार नाहीत.वरील कामांसाठी पर्यायी जागा पहावी.नाहीतर एकही झाडाचे नुकसान होणार नाही असे नियोजन करुनच बांधकाम करावे.एका झाडाचे अन्यन्न साधारण महत्त्व असताना तब्बल 56 झाडे तोडण्याचा निर्णय घेतला कसा ? आमचा झाडे तोडण्यास हरकत असुन तीव्र विरोध आहे.तरी पुनर्विचार करावा अन्यथा शेतकरी संघर्ष समितीअंतर्गत पिक संरक्षण सहकारी सोसायटी लि. शिंदखेडा तीव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे हि वाचा :
Breaking : घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कधी होणार कारवाई?..
MLA SATYAJIT TAMBE:नादुरुस्त जि. प. शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत? आमदार तांबेनी घेतली वृत्ताची दखल…
NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..
हयास नगरपंचायत शिंदखेडा सर्वस्वी जबाबदारी यांची राहील. हयाप्रसंगी शेतकरी संघर्ष समितीचे चेअरमन विजय ( नाना) पोपट चौधरी व व्हा. चेअरमन दिलीप आधार पाटील ,पिक संरक्षण सोसायटीचे चेअरमन विलास अर्जुन मोरे, अरुण चैत्राम देसले, संचालक दिलीप आधार पाटील, विजय पोपट चौधरी, योगेश माधवराव देसले, कैलास निंबा पाटील, दत्तात्रय जगन्नाथ देसले, अशोक राजाराम परदेशी, गजानन विश्वास भामरे, यादव प्रेमराज मराठे, बन्सीलाल पितांबर बोरसे, मिनाबाई प्रकाश पाटील, इंदुबाई रमेश मराठे, संजय गुलाबराव बडगुजर, गणपत कृष्णा देसले, भगवान दगेसिंग राजपूत, सचिव मनोहर रामराव भामरे आदी उपस्थित होते.
यादवराव सावंत ,प्रतिनिधी ,शिंदखेडा ,एम डी टी व्ही न्यूज धुळे ..