शिंदखेडा /धुळे -१८/७/२३
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबई धुळे जिल्हाध्यक्ष जितेंद्रसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक १७ जुलै २०२३ रोजी पत्रकारांनी धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना मुख्यमंत्री यांच्या नावे निवेदन देऊन अधिस्वीकृती समितीवर धर्मदाय, व्यास अंतर्गत नोंदणी असलेल्या संस्थांना पत्रकार संघटना गृहीत धरून केलेल्या चुकीच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई धुळे जिल्हा सचिव योगेश अहिरे,जिल्हा संघटक युवराज मोहिते,दिनेश कदम,वीरेंद्र कदम,बंटी कदम,जिल्हा सरचिटणिस गौतम आखाडे , यादवराव सावंत शिंदखेडा तालुकाध्यक्ष यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते,
महारष्ट्र राज्यात सोमवारी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे.
निवेदनातून म्हटले की, महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाने दि. 11 जुलै 23 रोजी राज्य अधिस्वीकृती समिती गठित करण्याबाबत शासन निर्णय जारि केला आहे.याच आदेशात मराठी पत्रकार परिषद या संघटनेवर धर्मदाय सह आयुक्त पुणे यांनी प्रशासक नियुक्त असल्याचे कळवले असल्याने संघटनेच्या सदस्यांनी मा. उच्च न्यायालयाच्या उक्त निकालाच्या अधिन राहुन करण्यात येत असल्याचे केले आहे.समितीवरिल एकुण 45 सदस्या पैकी राज्यावर पाच आणि विभागिय समितीवर नऊ असे 14 सदस्य घेण्यात आले आहेत.
तर महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघटना तीन, महाराष्ट्र संपादक संघटना दोन, मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघ एक , ब्रृहमहाराष्ट्र जिल्हा वृत्तपत्र संपादक संघ एक, महाराष्ट्र साप्ताहिक वृत्तपत्र संपादक परिषद एक व स्थानिक संघटनाचे काही प्रतिनिधी सदस्य घेण्यात आले आहेत. धर्मदाय आयुक्त यांच्याकडे 1860 सोसायटी व 1950 ट्रस्ट कायद्यांतर्गत सेवाभावी संस्थाचि नोंदणी केली जाते.तर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या मानधन , पगार घेणाऱ्या कामगारांसाठी कामगार कायदा ( लेबल युनियन अॅक्ट ) 1926 अंतर्गत नोंदणी केली जाते.कामगार विभागानेच संघटनेची नोंदणी करून आपल्या न्याय हक्काने हक्कासाठी आंदोलन , मागणी , उपोषण करण्याचा अधिकार मिळतो.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे हि वाचा :
Breaking : घरकुल घोटाळ्यातील आरोपींवर कधी होणार कारवाई?..
MLA SATYAJIT TAMBE:नादुरुस्त जि. प. शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत? आमदार तांबेनी घेतली वृत्ताची दखल…
NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..
सार्वजनिक न्यासा अंतर्गत नोंदणी असलेल्या संस्था या सेवा म्हणून काम करतात.सेवाभावी संस्था आणि श्रमिक संघटना साठी स्वतंत्र विभाग आणि कायदे आहेत. असे असताना माहिती आणि जनसंपर्क विभागासह सामान्य प्रशासन विभागांनाहि कोणतीही खातरजमा न करता काही लोकांच्या प्रभावामुळे चुकीच्या पद्धतीने अधिस्वीकृती समितीवर सदस्यांची नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने संस्थांना संघटना दाखवुन सदस्यांची नेमणूक नियुक्ती प्रकिया करण्याऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी आणि नियमानुसार कामगार आयुक्त यांच्या कडे कामगार कायद्यांतर्गत नोंदणी असलेल्या संस्थांना प्राधान्य दयावे. सरकारने दखल घेऊन चुकीच्या पद्धतीने झालेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या निवेनाद्वारे आज रोजी देण्यात आला,सरकारने येत्या 15 दिवसात कोणत्याही प्रकारचा निर्णय न घेतल्यास महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या धुळे जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष जितेंद्रसिंह राजपूत यांनी दिला आहे.
यादवराव सावंत ,प्रतिनिधी ,शिंदखेडा ,एम डी टी व्ही न्यूज ,धुळे …