शिंदखेडा पोलिसांनी चोरीचा गुन्हा काही तासात उघडकीस, दोन आरोपी अटक | Shindkheda police solved the crime within a few hours

0
1446
Shindkheda crime hours

शिंदखेडा: (Shindkheda) पोलिसांनी आज एका चोरीच्या गुन्ह्याचा तपास करून उघडकीस आणला आहे. या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदखेडा पोलीस स्टेशनला 29 ऑक्टोबर रोजी एका व्यक्तीने फिर्याद दिली होती की, त्याच्या घरातून टेक्स्मो कंपनीची 5 जेपी मोटार आणि 5 जेपी क्षमतेची जलपरी चोरीला गेली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

download

पोलिसांनी तपासादरम्यान गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून दोन आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी आज शिंदखेडा रेल्वे स्टेशन जवळील रेल्वे उड्डाण पुलाजवळ सापळा लावला. या सापळ्यात दोन संशयित इसम आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना लहु अर्जुन भिल (वय 27) आणि संजय भावा भिल (वय 33) असे नाव आहे. दोन्ही आरोपी शिंदखेडा तालुक्यातील परसामळ गावचे रहिवासी आहेत.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत फुलपगारे करीत आहेत.

या गुन्ह्याचा तपास करून उघडकीस आणल्याबद्दल शिंदखेडा पोलिसांची प्रशंसा केली जात आहे

शिंदखेडा प्रतिनिधी – यादवराव सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here