SHINDKHEDA:शहराला का होतोय दुषीत पाणी पुरवठा? कॉग्रेसच्या माजी नगरसेवकांचा संतप्त सवाल ..

0
188

धुळे -२३/७/२३

ऐन पावसाळा सूरू असतांना शहरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या बद्द्ल 21 कोटीची पाणी योजना असतांना एवढे दूषीत पाणी कसे ?असा संतप्त सवाल उपस्थित करत
काँग्रेसच्या नगरसेवकांनी थेट के.टी.वेअर जवळ असलेल्या जलशूद्दीकरण केंद्रावर धाव घेतली. शूद्धीकरण करणारी यंत्रणाच बंद असल्याचे त्यांचे
̤लक्षात आले. नगरपंचायतीचे प्रशासक काय करताहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सूरू आहे.पावसाने आधिच आरोग्य बिघडवणारे वातावरण निर्माण झालेले असतांना त्यात भर म्हणून नळांना गढूळ पाणी येवू लागले आहे . शहरासाठी 21 कोटी रूपये खर्चाची पाणी योजना मंजूर झालेली आहे. ती काम अद्याप पूर्ण नसले तरी या योजनेचा पाणीपूरवठा सूरू झालेला आहे. योजने अंतर्गत असलेले शुद्धिकरण केंद्रही कार्यांन्वयीत झालेले आहे. असे असतांना गेल्या आठवड्यापासून शहरात दूषीत पाणीपूरवठा होत असल्याचा आरोप कॉग्रेसचे माजी विरोधी पक्ष नेते सूनिल चौधरी ,कॉग्रेसचे गट नेते दिपक देसले, पक्षाचे शहराध्यक्ष दिनेश माळी, दिपक अहीरे,ऐड.निलेश देसले यांनी केला आहे. त्यांनी आज प्रत्यक्ष जलशूद्धीकरण केंद्रास भेट दिली.जलशूद्धीकरण यंत्रणा सूरू नाही,दर आठवड्याला पाण्याच्या टाकीची स्वच्छता करणे आवश्यक असतांना ती केली जात नाही,पाण्यात जीवजंतू निर्माण झालेले आहे.आणि याच दूषीत पाण्याचा पूरवठा शहराला होत आहे.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शहरात सात लाख लिटर क्षमतेचे दोन,तर पाच लाख लिटर क्षमतेचा एक असे तिन जलकूंभ आहे.ते अजून शोभेचेच आहे.ते कार्यान्वयित केले तर दर दोन दिवसाआड गावाला पाणीपूरवठा करणे शक्य आहे. आता सद्यास्थितीत सहाव्या दिवशी होत आहे. तेवढा पाणीसाठा करण्यास नागरीकांना अडचणी येतात.पाणी योजनेचे नळकनेक्शन देण्याचे काम पूर्ण झालेले नाही.जे दिले त्याची चाचणी घेतलेली नाही त्यावरच रस्त्यांच्या कोंक्रीटीकरणाचे काम केले जात आहे.
21 कोटी रूपये खर्चून पाण्याबाबत समाधानकारक स्थिती नाही असा त्यांचा आरोप आहे.
नगरपंचायतीची मूदत सहा महीण्यापूर्वी स़ंपलेलीआहे .सद्यस्थितीत प्रशांत बिडगर हे प्रशासक म्हणून काम पाहत आहे.
बिडगरसाहेब,नागरीकांच्या जीवाशी खेळू नका. जरा खूर्चीवरून ऊठून पाणीपूरवठ्याकडे लक्ष द्या अन्यथा नागरीकांचा संताप तूम्हाला महागात पडेल असा ईशारा त्यांनी दिला आहे.
यादवराव सावंत,शिंदखेडा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज धुळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here