धुळे -१५/४/२३
शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंसाराम आगरकर यांना रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास बातमीदार मार्फत गुप्त वार्ता मिळाली.. दोन्ही लाल रंगाच्या फॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक एम एच 18 एयू नऊ पाच शून्य दोन यातून येत असून त्यांच्याकडे तलवारी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली..
पोलीस हेडकॉन्स्टेबल ललित पाटील यांनी दोन पंच व डीबी पथकाचे अंमलदार यांच्यासह सापळा रचला..
रोहित राजेंद्र गिरासे वय वर्ष 24, मनी ओंकार गिरासे वय वर्ष 19 राहणार अहिल्यापुर तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांना शिताफीने पकडले आणि ताब्यात घेतलं..
शिरपूर फाट्यावरील बालाजी ऑटो पार्टस नावाने असलेल्या मोटार गॅरेजच्या निकामी स्पेअर पार्ट च्या आडोशाला पांढऱ्या रंगाच्या गुणीत एकूण दहा तलवारी आढळून आल्या.. त्यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सचिन वाघ यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 एक तीन चे उल्लंघन, 135 सह शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4/25 यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला..
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली…
या कारवाई करण्याच्या पथकात पोलीस निरीक्षक ए एस आगरकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश कुठे संदीप मुरकुटे ललित पाटील यांच्यासह कैलास चौधरी, गोविंद कोळी, मुकेश पावरा ,योगेश दाभाडे ,मनोज दाभाडे ,स्वप्निल बांगर ,अमित रणमळे, आदींचा समावेश होता..
राज जाधव शिरपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज