धुळे -१३/४/२३
दि. १०.०४.२०२३ रोजी सायंकाळी २१.०० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक ए. एस. आगरकर यांना गोपनीय माहिती मिळाली ..
एक इसम त्याची लाल रंगाची एच.एफ. डिलक्स मो.सा.क्र.एम.एच.२० एफ.एन.५१९३ हिच्यावर टोल नाक्याच्या पुढे गॅलेक्सी हॉटेलच्या समोर गावठी पिस्टल सोबत बाळगुन होता ..
संशयीतरित्या फिरत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली.
शिरपूर टोल नाका जवळील हॉटेल गॅलेक्सी समोर मुंबई-आग्रा महामार्ग क्र.३ च्या पलिकडे रोडलगत पश्चिम बाजूस जावून इसम नामे- (१) अरबाज इस्माईल शेख वय २१ २) साबीर शहा सगीर शहा वय १९ दोन्ही (रा. अंबिका नगर शिरपुर जि.धुळे) यांच्यावर २१.३० वाजेच्या सुमारास छापा टाकुन त्यांना शिताफीने पकडले .. त्यांच्या ताब्यात असलेल्या ०१ देशी बनावटीचे गावटी पिस्टल, ०२ जिवंत काडतुस ०२ मोबाईल व हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स मो.सा.क्र.एम.एच.२० एफ.एन.५१९३ लाल रंगाची तिचंबर पिवळया व सिल्व्हर रंगाचे पट्टे असलेली असा एकुण ८७,०००- रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला ..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंगन्यूज, जॉबअपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/3UoK7E0
त्यांच्या विरुध्द पोकॉ प्रशांत देविदास पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भारतीय अधिनियम ३/२८ स.पो.का. क. ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला केला ..
सदर आरोपीतांना . शिरपुर न्यायालयात हजर केले असता त्यांना ०२ दिवस पोलीस कस्टडी सुनावण्यात आलीय ..
सदर गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, मा. अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पो. स्टे. चे पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर, चार्ज उप विभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग. शिरपुर, पोउनि गणेश कुटे, पोउनि संदीप मुरकूटे, पोहेकॉ ललित पाटील, लादूराम चौधरी पोना,मनोज पाटील. रविंद्र आखडमल, पोकॉ, कैलास चौधरी, गोविंद कोळी, विनोद अखडमल, मुकेश पावरा, प्रशांत पवार, योगेश दाभाडे. मनोज दाभाडे, स्वप्नील बांगर, अमित रणमळे, भटू साळुंखे, सचिन वाघ, आरीफ तडवी, सनी सरदार या सर्वांचा कार्यवाही पथकात सहभाग होता .. .
एम. डी. टी व्ही न्यूज साठी राज जाधव ,शिरपूर ग्रामीण प्रतिनिधी.