शिरपूर शहर पोलिसांची कारवाई.: सुगंधित तंबाखूसह ४४ लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत.

0
249

चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.

शिरपूर /धुळे -२८/४/२३

इंदोर कडून शिरपूरकडे होणारी गुटख्याची अवैद्य वाहतूक शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने शिताफीने रोखली.
२० लाखांचा आयशर ट्रक व २४ लाखांची सुबंधीत तंबाखू असा ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
वाहन चालकास अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इंदोर कडून शिरपूरकडे येणार्‍या आयशर ट्रक क्र.एच.आर.४६ ई.१९६९ वाहनातून प्रतिबंधीत सुगंधी तंबाखुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती दि.26 रोजी दुपारी शिरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ए.एस.आगरकर यांना मिळाली होती.
त्यांनी तत्काळ डी.बी. पथकाला कारवाईचे आदेश दिले.
डीबी पथकाने कळमसरे शिवारातील चोपडा फाट्यावर सापळा लावला असता दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संशयीत ट्रकला शिताफीने पकडले. वाहनावरील चालकाने त्याचे नाव अशोक आजादसिंग बडख (वय 34 रा.बाळंद ता.जि.रोहतक, हरियाणा) असे सांगितले.
वाहनाची तपासणी केली असता त्यात मोबाईल टॉवर मालाच्या आडोशाला सुगंधीत तंबाखुने भरलल्या पांढर्‍या रंगाच्या पुठ्ठयाचे ४० खोके आढळून आले.
२० लाखांचे वाहन व २४ लाख रूपये किंमतीची सुगंधीत तंबाखु असा एकूण ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बावीस्कर यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात येवून वाहनातील मालाची तपासणी करून चौकशी अंती गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात ट्रक चालक अशोक बडख याला अटक करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि गणेश कुटे हे करीत आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली
पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर, पोउनि गणेश कुटे, संदिप मुरकुटे तसेच डी.बी. पथकाचे पोहेकॉ ललीत पाटील, लादुराम चौधरी, पोना मनोज पाटील, पोकॉ विनोद आखडमल, योगेश दाभाडे, मुकेश पावरा, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, प्रविण गोसावी, सचिन वाघ, भटु साळुंके तसेच होमगार्ड मिथुन पवार, राम भिल, चेतन भावसार व शरद पारधी यांचा या पथकात समावेश होता ..
एम. डी. टीव्ही साठी राज जाधव शिरपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here