घरांचे नुकसान ; शिरपूर-चोपडा रस्त्यावर झाड पडल्याने तासभर वाहतूक ठप्प
शिरपूर : जून महिन्याच्या सुरुवातीलाच मृग नक्षत्राच्या आधी मान्सून पूर्व पावसाने शिरपूर तालुक्यात हजेरी लावली. पावसाने ऊन आणि उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी मात्र वादळामुळे मोठ्या प्रमाणात घरांचे पत्रे उडाल्याने पडझड होऊन नुकसान झाले आहे. महसूल विभागाने त्वरित पंचनामे करावेत व भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
शिरपूर तालुक्यात काल रविवारी मान्सूनपूर्व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील बभळाज, होळनांथे गाव परिसरात वादळी वाऱ्यासह शहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. मात्र रविवार रोजी झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शिरपूर – चोपडा रस्त्यावर तरडी व बभळाज गावालगत मोठे झाड कोसळल्याने तासभर वाहतूक कोंडी झाली होती. तर वाऱ्यामुळे होळनांथे गावातील घराचे व दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे बभळाज व दहिवद विद्युत केंद्रालगत असलेल्या विद्युत खांब पडल्याने तसेच तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी विद्युत पुरवठा व्यवस्थित करण्याच्या कामात व्यस्त होते. बभळाजसह इतर ठिकाणीही विद्युत पुरवठा आज दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत बंद होता. सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास वीज पुरवठा सुरु करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. वीज पुरवठा सुरु झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. वादळी वाऱ्यासह पावसाच्या हजेरीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले होते.
राज जाधव. एम.डी.टी.व्ही. न्युज शिरपूर