Shirpur News – शिरपूर शहर मकर संक्रांती 2024 15 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जाणार आहे त्यातच शिरपूर पोलिसांनी पतंग उडविण्यासाठी प्रतिबंधित नायलॉन मांजा ( nylon manja ) विक्री करणाऱ्याला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 30,180 रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे.
दि.१४/०१/२०२४ रोजी ०६.०० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक ए.एस. आगरकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरपुर जि.धुळे येथे यडगल्लीतील महावीर प्रोव्हिजन दुकानात इसम नामे- हरीश हंसराज जैन रा.रथ गल्ली, वरचे गाव शिरपुर जि.धुळे हा त्याचे दुकानात सक्रांत सणाचे दिवसात पतंग उडविण्यासाठी शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजाची चोरटी बिक्री करीत आहे.
‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
त्यावरुन शिरपुर शहर पो.स्टे.चे पोनि ए.एस. आगरकर, पोउनि/संदिप मुरकुटे व संदिप दरवडे तसेच शोध पथकाचे अंमलदार व दोन पंच अशांनी शिरपुर जि.धुळे शहरातील वड गल्लीतील महावीर प्रोव्हिजन दुकान येथे जावुन इसम नामे- हरीश हंसराज जैन वय ५२ व्यवसाय व्यापार रा.रथ गल्ली, वरचे गाय शिरपुर जि.धुळे हा शासनाने प्रतियंधीत केलेला नायलॉन मांजा ठेवण्यास व वापरण्यास चंदी घातलेली असतांना सुध्दा तो स्वतःचे आर्थिक फायदयासाठी शासनाने जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करुन एकूण ३०,१८०/-रुपये किमतीचा मांजा मालाचो चोरटी विक्री करण्यासाटी कब्जात वाळगतांना मिळुन आल्यानं त्याचंवर छापा टाकुन त्यास मालासह ताब्यात घेवुन त्याचेविरुध्द शोध पथकाचे पोकों/मनोज महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पर्यावरण कायदा सन १९८६ चे कलम ५.१५ सह भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदरची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
- Allu Arjun Arrested : अल्लू अर्जुनला थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अटक..!
- Dhule News : दाऊळ गावात दोंडाईचा कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या दाखल…!
- Maharashtra Election 2024 Date : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं, ‘या’ तारखेला होणार मतदान…!
- LIVE TV
- Nandurbar News : ज.ग नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात अक्षय ऊर्जा दिन संपन्न…!
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मा.अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर भाग शिरपूर सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपुर शहर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक ए.एस.आगरकर, पोउनि/संदिप मुरकूटे, संदिप दरवडे व शोध पथकाचे पोहेको/ललित पाटील. पोना/रविंद्र आखडमल, पोकों/योगेश दाभाडे, प्रशांत पवार, आरीफ तडवी, भटु साळुंके, विनोद अखडमल, मनोज महाजन, सचिन वाघ, मनोज दाभाडे, गोविंद कोळी व चापोकों/ विजय पाटील अशांनी मिळून केली आहे.
शासनाने सक्रांत सणाचे कालावधीत पतंग उडविण्यासाठी प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा ठेवण्यास व वापरण्यास बंदी घातली असुन कोणीही पतंग उडविण्यासाठी मांजा मालाचा गैरकायदेशीर रित्या वापर करु नये. जर कोणी पतंग उडविण्यासाठी मांजा मालाची चोरटी विक्री करीत असल्याचे अगर त्याचा गर कायदेशीररित्या वापर करीत असल्याचे माहित झाल्यास त्याचेवर पर्यावरण कायदा सन १९८६ चे कलम ५.१५ सह भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे शिरपुर तालुक्यातील ( Shirpur News ) नागरिकांना जाहिर आवाहन करण्यात आले आहे.
एम.डि.टीव्ही साठी राज जाधव शिरपूर तालुका प्रतिनिधी.