शिरपूर तालुका पोलिसांनी रोखली गुटख्याची अवैध वाहतूक..

0
150

शिरपूर : ४/४/२०२३

महाराष्ट्र प्रतिबंधित गुटख्याची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकास शिरपूर तालुका पोलिसांनी जेरबंद केलं…

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रभारी अधिकारी सुरेश शिरसाठ यांना दिल्लीहून धुळ्याकडे जाणारे का चार चाकी वाहनातून गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली..

मुंबई आग्रा महामार्गावरील हाडाखेड येथील तपासणी नाक्यावर सापळा रचला..

एच आर 55 al 05 26 या संशयित वाहनाला थांबवून चालकाला ताब्यात घेतलं..

सखोल चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली… त्यात महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या गुटख्याचे बॉक्स आढळून आले…

अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्नसुरक्षा अधिकारी के एच बाविस्कर यांच्यासह सहकाऱ्यांनी पडताळणी केली असता त्यात 40 बॉक्स मध्ये अवैध गुटखा आढळून आला.. असा एकूण 22 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu

आणि वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला…

सदर कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली..

त्यांना अप्पर पोलीस प्रमुख किशोर काळे उपविभागीय पोलीस प्रमुख आन्साराम आगरकर यांचं सहकार्य लाभलं…

या कामगिरी करण्याच्या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट उपनिरीक्षक संदीप पाटील पोलीस नाईक संदीप ठाकरे कॉन्स्टेबल संतोष पाटील योगेश मोरे रंजीत दळवी मनोज पाटील यांनी सहभाग घेतला..

पुढील तपास उपनिरीक्षक संदीप पाटील करताय…
राज जाधव, शिरपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी, एम.डी .टी.व्ही. न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here