शिरपूर धुळे :१/१/२०२३
शिरपूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक किरण बारे यांना एका बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार ॲपे रिक्षा एम एच 18 डब्ल्यू 21 72 यातून सुमारे 40,360 किमतीची दारू तर बियरचे खोके भरलेला माल हस्तगत करण्यात आला.
शिरपूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचला. शिताफीनं या रिक्षा चालकास ताब्यात घेतलं.
शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावातील 36 वर्ष वयाचे ज्ञानेश्वर पंडित सोनार आपल्या ॲपे रिक्षातून एकूण 90,260 रुपयाचा मुद्देमाल घेऊन जात होते..
बनावटी दारू आणि बियर चे खोके आढळून आले..
पोलीस कॉन्स्टेबल सचिन वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरपूर पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड जिल्हा धुळे पोलीस उपअधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलीस निरीक्षक ए एस आगरकर, उपनिरीक्षक किरण बाऱ्हे, यांच्या समवेत ललित पाटील मनोज पाटील गोविंद कोळी सचिन वाघ बटू साळुंखे आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता..
या कामगिरीबद्दल शिरपूर पोलिसांचं कौतुक होतंय..
राज जाधव शिरपूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज