शिरपूर पोलिसांनी केला ९० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त..

0
188

शिरपूर:दि.११/०२/२०२३

गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका इसमास शिरपूर पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलं ..शिरपूर पोलिसांना याबाबत गुप्त वार्ता प्राप्त झाली होती.त्यानुसार त्यांनी हि कारवाई केल्याची समजते .

दिनांक 9 फेब्रुवारी रोजी १३.२५ वाजेच्या सुमारास सापळा रचून सदर इसमास रंगेहाथ पकडून मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा दाखल करण्यात आला .याबाबत पोलिसांना इसम नामे साबीर शेख रा. कुंभार टेक शिरपूर हा काळ्या रंगाच्या टी-शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेला व काळ्या रंगाची टीव्हीएस अपाची मोटर सायकल घेऊन कुंभार टेक येथे ग्रीन टी हाऊस हॉटेल समोर येणार असल्याची बातमी प्राप्त झाली.

शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाने दोन पंचां समक्ष सदर घटनास्थळी सापळा रचून ताब्यात घेतलं ..साबीर शेख वय 24 रा.यादगार किराणा जवळ कुंभार टेक शिरपूर यास जागीच पकडुन व त्याच्या ताब्यातील देशी बनवटीचे गावठी पिस्टल जिवंत काढतुस, मोबाईल व मोटरसायकल असा माल जप्त करण्यात आला.

त्यात 25 हजार रुपये किमतीचे देसी बनावटीचे पिस्टल, २०० रुपये किमतीच्या लोखंडी जिवंत काढतुस, ५०,०००रुपये किमतीची टीव्हीएस अपाची मोटरसायकल व 15 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण ९० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.भारतीय शस्त्र अधिनियमच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण बाऱ्हे हे करत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड , अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ए. एस आगरकर पोलीस निरीक्षक शिरपूर शहर पोलीस स्टेशन व प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर भाग व शोध पथकाचे पोलीस निरीक्षक किरण बाऱ्हे यांनी केलीय .

या पथकात पोलीस कॉन्स्टेबल ललित पाटील, लादुराम चौधरी, मनोज पाटील ,गोविंद कोळी, विनोद खडमल, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा ,प्रशांत पवार, स्वप्निल बांगर, अमित रणमळे, उमाकांत वाघ, भटू साळुंखे यांचा समावेश होता .

शिरपूर तालुका प्रतिनिधी,राज जाधव एम डी टी व्ही न्यूज बभळाज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here