शिरपूर : – शिरपूर पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करीत प्रतिबंधित तंबाखू वाहतूक करणाऱ्याना मोठा धक्का दिला आहे. शिरपूर पोलिसांनी विविध जातीच्या तंबाखूसह दोन वाहने असा एकूण ८४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईने प्रतिबंधित तंबाखू वाहतूक करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
याबाबत पोलीस सूत्राच्या माहितीनुसार, दिनांक १० मे रोजी रात्री शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सुरेश शिरसाठ यांना रात्री ०७ वाजेच्या सुमारास ट्रक (क्रमांक केए ०१ – एजे. ००१५ ) यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असणारी सुगंधीत तंबाखू भरुन इंदोरकडून धुळेच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळाली. सपोनि शिरसाठ यांनी आपल्या पोलीस पथकाला सदर बातमीची हकिगत सांगून मुंबई-आग्रा महामार्गावरील दहिवद गावजवळील छत्रपती हॉटेल समोर नाकाबंदी करण्यात आली. रात्री ०१.०० वाजेच्या सुमारास संशयीत क्रमांकाची ट्रक येताना दिसली. सदर गाडी पोलीसांनी हात देवून थांबवली असता सदर वाहनातून चालकास खालील उतरवून त्यास सदर वाहनामध्ये काय माल भरला आहे असे विचारले. तो समाधानकारक उत्तर देत नसल्याने सदर वाहन पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यांनतर दुसरे वाहनाबाबत गुप्त माहिती मिळाली की, टाटा कंपनीचे ट्रक ( क्रमांक केए ०१ – एजे २७७६ ) या वाहनातुन देखील प्रतिबंध तंबाखूची वाहतूक होत आहे. सपोनि सुरेश शिरसाठ यांनी पोलीस पथकाला सोबत घेऊन हाडाखेड सिमा तपासणी नाका येथे नाकाबंदी करुन पहाटे ०४.०० वाजता संशयीत क्रमांकाची ट्रक थांबवली. सादर ट्रक पोलीस ठाणे आवारात आणण्यात आले.
यात ट्रक क्रमांक ( केए ०१- एजे ००१५ ) वरील चालकास नाव गाव विचारले असता त्याने आपले नाव किशोरराव एन नागेन्द्रराय (वय ३१, रा. रेल्वे कम्पाउन्ड मपाडी रोड बेंगलोर नॉर्थ कर्नाटक) असे सांगितले. या वाहनातून ३३ लाख ६० हजार रुपये किमतीची रत्ना ३००० कंपनीची तंबाकू एकूण २८० बॉक्स आढळून आले. १५ लाख रुपये किमतीचे वाहन असा ४८ लाख ६० हजार रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दुसरे वाहन ( क्रमांक केए ०१ – एजे २७७६ ) वरील चालक मंजू रोक्कडदम चन्नाप्पा (वय ३३ रा.चन्नाप्पा एनए प्लॉट मदान भावी धारवाड कर्नाटक) असे सांगितले. या वाहनातून १२ लाख रुपये किमतीची रत्ना ३००० कंपनीची तंबाकू, ७ लाख ६४ हजार ४०० रुपये किमतीची प्रभात ३५० कंपनीची तंबाखूसह १५ लाख रुपये किमतीचे वाहन असा ३४ लाख ६४ हजार ४०० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. दोन्ही वाहनातून एकूण ८३ लाख २४ हजार ४०० रुपये किमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, पोलीस निरिक्षक अन्साराम आगरकर अति. कार्यभार उपविभागिय पोलीस अधिकारी शिरपूर विभाग शिरपूर यांच्या मार्गर्शनाखाली शिरपूर तालूका पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई संदीप पाटील, कृष्णा पाटील, पोहेकॉ संजय सुर्यवंशी, पोना संदीप ठाकरे, पोकॉ रोहीदास पावरा, चालक पोकॉ मनोज पाटील, संतोष पाटील, इसरार जकाउल्ला फारुकी, पोकॉ कृष्णा पावरा पोकॉ मुकेश पावरा, पोकॉ योगेश मोरे यांच्या पथकाने केली.
राज जाधव. एम.डी.टी.व्ही.न्युज, शिरपूर ग्रामीण