शिरपूर : जन्म दाखला नोंदीसाठी १४०० रुपयांची लाच ; ग्रामसेवक जाळ्यात

0
207

नंदुरबार : न्यायालयाने जन्म नोंद करण्याचे आदेश पारित केल्यावर देखील १४०० रुपये लाच घेणारा ग्रामसेवकी अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात सापडला आहे. शिरपूर तालुक्यातील जामान्यापाडा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील जामान्यापाडा येथील तक्रारदार यांच्या आत्याच्या जन्म दाखला मिळणेसाठी शिरपूर न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. याबाबत सुनावणी होऊन शिरपूर न्यायालयाने तक्रारदार यांच्या आत्याची जन्माची दप्तरी नोंद घेण्यासाठी १४ आक्टोंबर २०२२ रोजी आदेश पारित केले होते. दरम्यान, तक्रारदार यांनी त्यांच्या आत्याची जन्माची दप्तरी नोंद होण्यासाठी १६ मे २०२३ रोजी जामनयापाडा ग्रामपंचायतीत न्यायालयाच्या आदेशाची प्रत जोडून अर्ज केला होता. यासाठी ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी यांनी १४०० रुपये लाच मागितल्याबात धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५ जून २०२३ रोजी पडताळणी केली असता ग्रामसेवक गुलाब रामदास चौधरी यांनी तक्रारदार यांच्या तात्याची जन्म नोंद घेण्यासाठी लेट फीच्या नावाखाली पंचासमक्ष १४०० रुपये लाच घेताना मिळून आले. यावेळी सापळा लावलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. दरम्यान ग्रामसेवक चौधरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याना धक्का देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने लावलेल्या सापळ्यातून चौधरी सुटू शकले नाहीत. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन. १९८८ चे कलम ७ अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सदर कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजितसिंग चव्हाण, राजन कदम, शरद कटके, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, रोहिणी पवार, वनश्री बोरसे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो शिरपूर- नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here