धुळे -१४/६/२३
मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा कडून शिरपूरकडे बियरची वाहतूक करणारे पीकअप वाहन पकडून पोलिसांनी त्यातून २ लाख ७ हजार ३६० रु. किमतीचा super strong beer १८ कॅन असलेले ९६ बॉक्स.५ लाख रु. किमतीची पांढऱ्या रंगाची एमएच. ४०९२ असा अर्धवट क्र. असलेली पिकअप वाहनासह एकूण. ७,०७,३६० रु. किं.चा. मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
तसेच याप्रकरणी पोलिसांनी वाहन चालकास त्याच्या राहत्या घरून (पाळनेर ता. शिरपूर जि. धुळे) येथून ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र– मध्यप्रदेश सिमावर्ती भागात अवैध दारूची वाहतुक मोठ्या प्रमाणात होत असते. पोलिसांकडून अनेकदा कारवाई होवून देखील ही दारूची चोरटी वाहतुक अजूनही सुरूच आहे. त्यानुसार अवैध वाहतुक होत असलेल्या बियर (दारू) पोलिसांनी जप्त करण्याची कारवाई शिरपूर तालुका पोलिसांनी केली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्या अनुषंगाने सपोई, जयेश खलाणे यांनी पोसई,कृष्णा पाटील यांना पोहेकॉ, सईद शेख, पोकॉ, योगेश मोरे, संतोष पाटील, कृष्णा पावरा संजय भोई अशांना बोलवून माहिती दिली, व योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी सापळा लावला असता दि. १३,०६,२०२३ रोजी रात्री ०१:३० च्या सुमारास पळासनेर गावाजवळ मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सार्वजनिक ठिकाणी विना नंबरची एक पिकअप वाहन आल्याची दिसली
हे सुध्दा वाचा
नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS
कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार मध्यान्ह भोजन : पालकमंत्री डॉ.गावित – MDTV NEWS
“मोदी सरकारचे नऊ वर्ष” … तळोद्यात पदाधिकाऱ्यांनी दिला कामाचा आढावा – MDTV NEWS
त्याचे नाव राजेंद्र पोपट भील असं होत ..
सदरच्या वाहनातून बियर (दारू) आढळून आल्याने वाहन ताब्यात घेण्यात आलं
चालकाचा शोध घेतला असता त्याला राहत्या घरून पळासनेर येथून अटक करण्यात आली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
त्यास पोलीस ठाणे येथे आणून सदर वाहनाची दि. १३,०६,२०२३ रोजी सकाळी पंचांसमक्ष चालक नामे, राजेंद्र पोपट भील (रा. पाळसनेर ता. शिरपूर जि. धुळे) याच्या समक्ष तपाणी करून वरील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,पोहेकॉ, सईद शेख यांनी सरकार तर्फे आरोपी राजेंद्र पोपट भील वय ३७ याच्या विरुद्ध दारू बंद्दी अधिनियम १९४९ कलम ६५ (अ) ६५ (ई) १८० नुसार फिर्याद दिली आहे.
हे सुध्दा वाचा
नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS
कामगारांना कामाच्या ठिकाणी मिळणार मध्यान्ह भोजन : पालकमंत्री डॉ.गावित – MDTV NEWS
“मोदी सरकारचे नऊ वर्ष” … तळोद्यात पदाधिकाऱ्यांनी दिला कामाचा आढावा – MDTV NEWS
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे,पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर शिरपूर शहर पो. स्टे. चार्ज पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सपोई, जयेश खलाणे, पोसई, कृष्णा पाटील, पोहेकॉ, सईद शेख, पोकॉ, योगेश मोरे, संतोष पाटील, कृष्णा पावरा संजय भोई अशांनी मिळून केली आहे.
राज जाधव ,शिरपूर तालुका प्रतिनिधी बभळाज,एम डी टी व्ही न्यूज ..