नंदुरबार -२६/४/२३
शिव महापुराण कथा श्रवण करणे म्हणजेच आयुष्याचे पुण्य कर्म आहे.शंकर भोलेनाथ यांची सेवा म्हणजे जीवनाचे सार्थक होईल.मात्र हल्ली एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत चालल्याची खंत वृंदावन निवासी पुज्य श्री रौनक कृष्णाजी महाराज यांनी व्यक्त केली.
नंदनगरीत मंगळवार पासून शिव महापुराण कथेला प्रारंभ झाला.
यावेळी पुढे बोलताना रौनक कृष्णाजी महाराजले की,महाराष्ट्रच्या पावन भूमित् अनेक संत महात्मे होऊन गेले.
नंदुरबार देखील संत महात्म्यांची पावनभूमी आहे.
या ठिकाणी कथा करण्याची संधी मिळाली.
शिव महापुराण कथेच्या अखेरच्या दिवशी भाविकांना रुद्राक्ष वाटप करण्यात येईल.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन रौनक कृष्णाजी यांनी केले.
लक्ष्मीनारायण जयस्वाल परिवारातर्फे मंगळवार दि. 25 एप्रिल पासून शिव महापुराण कथेस प्रारंभ झाला.
भव्य संगीतमय श्री द्वादश ज्योतिर्लिंग शिव महापुराण कथा मंगळवार दि. 25 एप्रिल ते दि.1 मे 2023 पर्यंत दररोज दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजे पर्यंत शिव महापुराण कथा होईल.
कथावाचक म्हणून पूज्य श्री रौनक कृष्णाजी शिव महापुराण कथेचे निरूपण करीत आहेत.
शहरातील तळोदा रस्त्यावरील जैन मंदिरा मागील ग्यारा मिल कंपाऊंड (उड्डाणपुलाखाली) येथे भव्य मंडप उभारण्यात आला आहे.
कथेची समाप्ती दि.1 मे रोजी होणार असून महाप्रसाद आणि विनामूल्य रुद्राक्ष वितरण करण्यात येणार आहे.
भाविकांनी शिव महापुराण कथेचा आणि महाप्रसादचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक लक्ष्मीनारायण जयस्वाल (लचछुसेठ )
आणि परिवार व जय अंबे टेन्ट हाऊस यांनी केले आहे.
प्रविण चव्हाण, प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार,