महाराष्ट्रातील राजकारणातील सध्याच्या नाट्यात आज आणखी एक मोठा टर्निंग पॉइंट आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांचा गटच खरी शिवसेना ( Shiv Sena) असल्याचा निर्णय विधानसभा उपाध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी दिला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
नार्वेकरांनी आज विधानसभा सचिवालयात याबाबतची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, शिवसेनेची घटनाच हे सांगते की त्यात कशी पदरचना आहे. त्यानुसारच खरी शिवसेना कुणाची आहे? याचा निर्णय घेतला आहे. २१ जून २०२२ ला शिवसेनेत दोन गट पडले. सगळ्या पुरावे, साक्षी यांचा विचार करता मी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे ही मान्यता देतो.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
‘एम.डी टीव्ही’ चं Telegram Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे विधानसभेतील संख्याबळातही बदल होईल. शिंदे गटाचे संख्याबळ वाढेल, तर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या गटाचे संख्याबळ कमी होईल.

या निर्णयामुळे शिवसेनेच्या पुढील वाटचालीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. शिंदे गट आता आपला स्वतंत्र पक्ष म्हणून घोषणा करेल का, याकडे लक्ष लागून राहील.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारणात नवीन राजकीय समीकरणे निर्माण होतील, याची शक्यता आहे.
- Maharashtra Expressway – ‘समृद्धी’नंतर महाराष्ट्राला मिळणार ‘पुणे-बंगळूर’ ग्रीन फील्ड…!
- Shreyas Iyer ची प्रकृती चिंताजनक सिडनीतील रुग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू..!
- देशाचे ५३ वे सरन्यायाधीश कोण ? CJI Gavai यांनी सुचवले मोठे नाव..
- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी Maharashtra Schools चा मोठा निर्णय! एक्झाम फॉर्म भरण्यासाठी आता ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
- सरकारी कार्यालयात ID Card नसेल, तर Government Employee च्या पगार कापणार? मोठा निर्णय
नार्वेकरांनी मांडलेले मुद्दे–
- २१ जून २०२१च्या बैठकीचे हजेरीपत्रकाची मुळ प्रत व सादर केलेली प्रत यांमधील तफावत यामुळे हा पुरावा ग्राह्य धरता येणार नाही
- बैठकीला अनुपस्थित राहणे हे अपात्रतेचे कारण ठरू शकत नाही. विधीमंडळ अधिवेशनास अनुपस्थिती हे कारण ठरू शकते
- एकनाथ शिंदेंना हटवण्याचा अधिकार पक्षप्रमुखांना नाही. पक्षप्रमुखाला पक्षातून कोणालाही काढता येत नाही. एकाचा निर्णय लोकशाहीसाठी धोक्याचं आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेले निर्णय ग्राह्य धरले जातील.
- सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेंचा हे सिद्ध झाल्याने २१ जून २०२२ च्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्दयावर अपात्रता ठरविता येणार नाही.
- बैठक घेतेवेळी सुनिल प्रभू हे प्रतोद नव्हते. त्यामुळे त्यांनी बजावलेला व्हिप ग्राह्य धरता येणार नाही.
- भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य आहे. भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड वैध आहे. २१ जून २०२२ रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते.
- विधिमंडळ बहुमत ज्याचे असेल त्याचाच पक्ष असतो. त्यामुळे शिंदे गट हीच खरी शिवसेना असून एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र आहेत.
- मिलिंद नार्वेकर आणि फाटक एकनाथ शिंदेंना सुरतला भेटले त्यामुळे आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही हे मान्य करता येणार नाही. भरत गोगावले यांनी सांगितले की सगळे आमदार उपस्थित होते. ३ आमदारांनी ही साक्ष दिली आहे की नार्वेकर आणि फाटक शिंदेंना भेटले.
- संपर्काच्या बाहेर गेले, केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. शिवाय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हे ही सिद्ध झाले.
- शिवसेनेची मूळ घटना मान्य, बाकीच्या घटनादुरुस्त्या मान्य नाहीत


